
`दै सकाळ’ मधील स्नेही व माजी संपादक अरूण खोरे यांनी `दलित पॅंथर्सचा झंझावात’ हे जयदेव गायकवाड लिखित पुस्तक अलीकडे मला पाठविले. पुण्याच्या `हर्मिस प्रकाशन’ ने प्रकाशित केलेले हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील दलित पँथर्स चळवळीच्या इतिहासाच्या उदयास्ताचा संक्षिप्त माहितीकोषच होय. जयदेवने, ``आंबेडकरी चळवळीला क्रांतिकारी वळण देणारा माझा भाऊ नामदेव ढसाळ’’ यास ते अर्पण केले आहे. धसाळ हा जयदेव गायकवाड यांचा सख्खा मावस भाऊ.