
येत्या फेब्रुवारी मध्ये दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका होत असून त्यात प्रामुख्याने आम आदमी पक्ष विरूद्ध भाजप व काँग्रेस असे तिरंगी सामने होतील. यावेळी भाजप व काँग्रेस आम आदमी पक्षाच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस पक्ष भाजपचा `बी –टीम’ म्हणून पुढे आल्याने त्या दोघांनीही आम आदमी पक्षाला `कॉर्नर’ केले आहे.