
नवी दिल्ली - बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्यावरून अमेरिकेत संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे तीव्र पडसाद अलीक़डे हॉलीवुड नगरी लॉस एन्जेल्समध्ये पडले.
कॅलिफोर्निया हा डेमॉक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला. तेथे बेकायदेशीररित्या राहाणाऱ्या लोकांना हुसकावून लावण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 4100 नॅशनल गार्ड्स लॉस एन्जेल्सला पाठविले. या निर्णयाविरूदध लॉस एन्जेल्समध्ये झालेल्या निदर्शनांना ठेचून काढण्यासाठी त्यांना सर्वाधिकार देण्यात आले होते. प्रक्षुब्ध निदर्शनात जाळपोळ व काही प्रमाणात लुटालूट झाली. निदर्शकांना मारहाण झाली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराचा वापर करण्यात आला.