Stop Dowry System: हुंडा शिक्षित समाजाची अज्ञानी परंपरा
Social Justice : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हुंडा प्रथा व त्यातून होणाऱ्या अत्याचारांची भीषणता पुन्हा समोर आली आहे. सुशिक्षित समाजातही पितृसत्ताक मानसिकतेमुळे स्त्रिया असुरक्षित आहेत.
पुण्यात वैष्णवी हगवणे या तरुण महिलेचा झालेला मृत्यू देशभर चर्चेचा विषय ठरला. सासरच्या मंडळींकडून होणारी सततची पैशांची मागणी आणि तिच्यावर होणारा मानसिक आणि शारीरिक अत्याचार या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.