esakal | मोडून पडला संसार,आता वेळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची!
sakal

बोलून बातमी शोधा

MAHAD FLOOD

मोडून पडला संसार,आता वेळ पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पुणे - मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलं. संसार उघड्यावर पडला. सर्वसामान्यांची दैना झाली. कुणाच्या स्वप्नातही नव्हतं असा घाला पावसानं घातला. आणि अनेकांना वेदना दिल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यात पावसानं घातलेलं थैमान काळजात कालवाकालव करणारं होतं. तिथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. जगावं की मरावं हा प्रश्न खऱ्या अर्थानं आता त्या स्थानिक गावकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनानं सर्वोतोपरी मदत केली आहे. वेगवेगळ्या सोयीसुविधाही पुरवल्या आहेत. मात्र त्यात होणारा विलंब यामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. (due to heavy rain flood condition in raigad district all system crashed out yst88)

अशातच काही सेवाभावी संस्थांनी त्या नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्या लोकांची विचारपूस करुन त्यांना काय हवंय ते पुरवण्यासाठी पुढाकार घेतलायं. भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई यांनी काही दिवसांपूर्वी कोकणला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत काही डॉक्टरांची टीमही होती. स्थानिकांना भेटणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्यांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करणं, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मानसिकदृष्ट्या आधार देणं हे काम प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं.

याविषयी अधिक माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पूरग्रस्त बांधव मदत प्रकल्पाचे समन्वयक डॉ.भोई म्हणाले, आम्ही कोयना नगर परिसरात भेट दिली. त्यावेळी तिथे वैदयकीय पथक मदतीसाठी तयार होते. मात्र तेव्हा काही गोष्टी या प्रकर्षानं जाणवल्या त्यात उल्लेख करायचा झाल्यास, काही ठिकाणी मदतीचा ओव्हरलोड, तर काही ठिकाणी कमतरता. बाधितांना ठेवलेल्या तात्पुरत्या निवासस्थानात मनुष्यबळ अपुरे होते. मदत स्वरूपात येणारे अन्न-धान्य, भांडी, छत्र्या, रेनकोट, खाद्यपदार्थ वाटप यंत्रणेत सुसूत्रता नव्हती. त्यामुळे त्या वस्तु वाया जात असल्याचे दिसुन आले.

mahad news

mahad news

mahad news

mahad news

ज्या ठिकाणी बाधितांना ठेवले आहे. त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे बांधव आणि तेथे असणारी टॉयलेट व्यवस्था याचे खूपच व्यस्त प्रमाण २००-३०० लोकांमध्ये २-३ टॉयलेटस् व याची दैनंदिन स्वच्छता होणे आवश्यक आहे. ही गोष्ट त्याठिकाणी जाणवली. पुराचे पाणी ओसरल्यावर साथीचे आजार, त्वचेचे विकास, पोटाचे आजार वाढण्याची शक्यता. त्यासाठी आतापासूनच नियोजन गरजेचं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.भोई यांनी तयार केलेल्या निवेदनाची प्रत प्रशासन यंत्रणेला दिली आहे.

loading image
go to top