इथेनॉलच्या हट्टाने नितीन गडकरी अडचणीत

E20 Ethanol Blending Policy Sparks Debate: ट्रोलमधील E20 इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावरून देशात चर्चा तीव्र झाली आहे. वाहनांचे मायलेज, शेतकऱ्यांचे हित, खाद्यतेल उत्पादन आणि इंधन आयातीवरील परिणामांमुळे E20 ऐवजी E10 मिश्रणाचा पर्याय विचारात घेण्याची मागणी होत आहे.
E20 Policy Controversy

E20 Policy Controversy

esakal

Updated on

परिवहन आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी हे पेट्रोलमध्ये इ-२० इथेनॉलचे मिश्रण करण्याच्या धोरणामुळे गोत्यात आले आहेत. त्यांच्या या धोरणाला देशातून सर्वत्र विरोध होत असून, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अलीकडे त्याविरूद्ध देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे, केंद्र सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन आणि अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आकाश पुजारी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये लिहिलेल्या लेखात गडकरी यांचे नाव न घेता त्यांच्या धोरणाला विरोध केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com