गोफण | 'प' से पनौती नहीं... पर्णकुटी!

gofan article
gofan articleesakal

'प' पासून सुरु होणारा 'तो' विखारी शब्द जेव्हापासून कानावर पडला, तेव्हापासून वातावरणात कमालीची अस्वस्थता वाढली होती.. भारतवर्षाचे चक्रवर्ती सम्राट नमोभाई विश्ववंदे ताफेने फणफणले होते. काय करावं अन् काय नाही, हे त्यांना सुचत नव्हतं. आजवरच्या कित्येक टीकांच्या तोफगोळ्यांवर स्वार होत त्यांनी विरोधकांच्या तंबूत धमाके उडवून दिले होते. पण आजची टीका त्यांच्या भलतीच जिव्हारी लागली...

कारणही तसंच होतं म्हणा. स्वतःच्या गावात.. स्वतःच्या जागेत... स्वतःच्या नावाने.. स्वतःच्या शेतातली.. स्वतःच्या हाताने लाल माती अंथरुन कुस्तीचं मैदान बांधावं; अन् एकेदिवशी त्याच मैदानावर परगावच्या पैलवानं आपली पाठ लोळवावी... कसं वाटेल?

तशा मानसिक गर्तेत नमोभाई बुडाले होते. झाली शोभा कमी होती की काय, म्हणून... तिकडून गावच्या दुसऱ्या कोपऱ्यातून एखाद्याने भोंगा लावून पनौतीS.. पनौतीSS... म्हणून ओरडायला सुरुवात केली होती.

ही सगळी तारांबळ झाल्याने चक्रवर्ती सम्राट नमोभाई विश्ववंदे निराश झाले होते. एखाद्या विरक्त साधुप्रमाणे पर्णकुटीमध्ये ते ध्यानाला बसले. अत्याधुनिक सामुग्रीपासून बनवलेली.. हुबेहुब पौराणिक भासावी, अशी ती पर्णकुटी होती. अस्वस्थ वाटू लागल्याने आणि तो 'प' पासून सुरु होणारा शब्द वरचेवर बोचत असल्याने त्यांनी ही पर्णकुटी उभारण्याचं फर्मान सोडलं होतं.

अगदी काही तासांमध्ये अत्याधुनिक, सर्व सोयींनी युक्त अशी ती झोपडी तयार झाली होती. साधूच्या वेशातल्या नमोभाईंकडे ते काहीतरी धर्मसंदेश प्रसूत करतात की काय, असं वाटत होतं. कमालीची अस्वस्थता आणि धार्मिक मांगल्य; असा एक विचित्र वातावरणीय संगम त्या कुटीमध्ये तयार झाला होता.

झपाझप पावलं टाकीत मोटाभाई गुजराती त्या पर्णकुटीमध्ये दाखल झाले. मोटाभाई म्हणजे चक्रवर्ती सम्राटांचा सगळ्यात विश्वासू सरदार. वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे नमोभाईंच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा सखासोबती. आतमध्ये येताच त्यांनी संताप व्यक्त करत बोलायला सुरुवात केली.

मोटाभाईः महाराज, ये हम क्या सुन रहें हैं.. कोईभी आके आपको कुछ भी बोल रहा हैं...

नमोभाईः (सृष्टीत जे घडतं ते सगळं आपल्याला घडायच्या आधीच माहिती असतं आणि ते घडायच्या आधीच मी तोडगा काढलेला असतो.. या अर्विभावात) जिसे जो बोलना हैं बोलने दो.. हमपर कोई उंगली नहीं उठा सकता|

मोटाभाईः (राग पोटात घेत) महाराज, वो सब हैं लेकिन.. बडे दिखने वाले छोटे-छोटे बच्चे जो मन करे वो बोल रहें है, आपको उसने पन्-

नमोभाईः ('प' पासून बाहेर पडणारा शब्द तसाच तोंडातल्या तोंडात रोखला) प..प... क्या लगा रखा हैं. प से पप्पू भी होता हैं| पता हैं?

मोटाभाईः (लटकी निराशा दाखवत) वो पुराना हो गया महाराज| कुछ नया चाहिए नया.. की उनका मुँह बंद हो जाए

नमोभाईः (जुन्या देवादिकांच्या मालिकांमध्ये एखादा राजा आकाशभर हसत असे.. तसं हसत) हाहाहा..हाहाहा..हाहाहाहा..SS..हाहाहाहाहाSSS... हाहाहाहा..SS...हाहाS..हाहाहाहाSSS

मोटाभाईः (नोभाईंचं हसू थांबायचं नाव घेत नव्हतं. त्यामुळे मोटाभाईंनी युक्ती काढली. आकाशाकडे बघून हात जोडले आणि कुणीतरी आकाशातून हसतंय, असा भाव चेहऱ्यावर आणला) महाराजS.. महाराजSS.. महाराज... आप अपरंपार हो... आप महान हो.. मैं सब कुछ समझ गया|

नमोभाईः (आश्चर्याने) समझे? तो बताओ?

मोटाभाईः (पेंगुळून हसत) थोडा क्लू दे दो महाराज|

नमोभाईः (डोळ्यात चमक) पर्णकुटी! ये हमारी पर्णकुटी! 'पनौती' का नाम बदल के आजसे 'पर्णकुटी' कर देते हैं...

मोटाभाईः (चकित होत) मतबल? किसका ना बदलेंगे? पनौती ना तो नगरी हैं ना इंसान.. तो फिर?

नमोभाईः (खेकसत) लेकिन पर्णकुटी तो कुटिया हैं ना.. भगवान की कुटिया. चौदा साल तक भगवान ऐसी ही कुटिया में रहते थें...

मोटाभाईः (डोळे मोठे करुन) तो?

नमोभाईः (मोठ्याचे खेकसत) तो क्या तो? भगवान की कुटिया को कौन कैसे पनौती बोलेगा.. और भगवान हमारे हैं-हम भगवान के? समझें?

मोटाभाईः (कळलं नसलं तरी सगळंकाही कळल्याचा आव आणत) महाराज की जय होS... चक्रवर्ती सम्राट नमोभाई विश्ववंद की जयSS

कळूनही न कळल्यासारखं आणि काहीच न कळता सगळंकाही कळल्यासारखं; अशा विचित्र अवस्थेत मोटाभाई होते...

हमरी उलझन, सुलझाओ भगवन
तुमरे बिन हमरा कौनो नाहीं...

हे गाणं गुणगुणत मोटाभाई तिथून निघून गेले.

समाप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com