गोफण | गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या!

ऐका हो ऐका.SS... गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या..! सत्ता हवी असेल त्याला पदं देऊ.. धन-द्रव्य हवं असेल त्याला खोके देऊ... प्रतिष्ठा हवी असेल त्याला 'सर्वोच्च' मानपान देऊ!! सगळ्यांना सगळं मिळेल.. कुणी कुठे खिन्न मनाने दिसलं तर राजदरबारी खबर करा.. कुणी आवाज चढवला तर त्याला फरफटत आणाSS..
Gofan Article
Gofan Articleesakal

ऐका हो ऐका.SS... गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या..! सत्ता हवी असेल त्याला पदं देऊ.. धन-द्रव्य हवं असेल त्याला खोके देऊ... प्रतिष्ठा हवी असेल त्याला 'सर्वोच्च' मानपान देऊ!! सगळ्यांना सगळं मिळेल.. कुणी कुठे खिन्न मनाने दिसलं तर राजदरबारी खबर करा.. कुणी आवाज चढवला तर त्याला फरफटत आणाSS..

चक्रवर्तीसम्राट.. महान सेनानी, कर्तव्यकठोर, धर्मरक्षक, जगमान्य युद्धनीतीकुशल, बायोगॅस निर्माणक, डिजिटलस्य बायनरी लँग्वेज उद्गातकSS... अनंतवेळा श्री.. श्रीमान नमोभाई विश्ववंद्येSSS यांजकडून फर्मान..फर्मान...फर्मानSS.. कुणाचीही गय गेली जाणार नाही. सगळ्यांनी खुश रहायचं.. आनंदी जगायचं... कारण अच्छे दिन आलेले आहेत.

तेवढ्यात एकजण पुढे आला. म्हणाला, उपाशी-नाही तापाशी नाही.. खिन्न नाही की आनंदी नाही. गावातल्या कोपऱ्यात एकाने 'मोहब्बत की दुकान' सुरु केली. राजदरबाराच्या सांगण्यावरुन काहींनी त्याची दुकान फोडली. तो एका कोपऱ्यात रडत बसलाय.. म्हणतोय न्याय मिळेल का?

ऐका हो ऐकाS.SS... चक्रवर्ती सम्राटांनीही एक 'प्यार की दुकान' सुरु केलीय. तिथेच तुम्हाला खरंखुरं प्रेम मिळेल.. बाकी दुकानात बनावट परकीय आक्रमकांची मोहब्बत आहे.. ती नाकारुन आपलं ते स्वीकारा असं फर्मान आहे होSS.. तिकडे कुणी दिसलं तर त्याला काळ्या कोठडीत डांबून चाबकाचे फटके दिले जातील होS..

दुसरा एकजण पुढे आला. म्हणाला, प्यार नको की मोहब्बत नको.. सत्ता नको की पद नको.. सगळ्यांना पोटाला लावणारा, रात्रंदिवस कष्ट उपसणारा.. तो एक शेतकरीदादा बांधावर बसून रडत बसलाय.. गावच्या भाकरीची सोय करता करता तोच उपाशी राहिलाय.. म्हणतोय, न्याय मिळेल का?

ऐका हो ऐकाS.. कान देऊन ऐकाSS नीट ऐका! गावात सगळे सुखी-समाधानी आहेत.. सगळ्यांना पोटभर जेवण मिळतंय. चक्रवर्ती सम्राट नमोभाई विश्ववंद्ये यांनी अन्नसुरक्षा आणलीय होSS. कुणालाही उपाशी राहण्याचा प्रश्नच नाही. तो जो कुणी शेतकरीदादा रडत बसलाय त्याला म्हणावं स्वस्त धान्य दुकानातून धनधान्य घेऊन जा.. होSS

गर्दीतून आणखी एकजण पुढे आला. म्हणाला, प्रतिष्ठा नको की मानपान नको.. हाताला काम पाहिजे. राजाजींच्या मुद्राची ब्रिदा झाली.. ७५ हजार नोकऱ्यांची अवस्था गैरमार्गी झाली अन् खासगी नोकऱ्यांची ब्रँडिंग झाली.. काय करावं काही कळेना.. अभ्यास करुनही नोकरी नाकारलेला तरुण रडत बसलाय..

ऐका हो ऐकाS.. आत्मनिर्भर बना हाच चक्रवर्ती सम्राटांचा सल्ला आहे. कुणाला काही मागू नका, देशासाठी समर्पण द्या.. चहा विका-भजे तळा पण रडू नका. जगात लागणारी कौशल्य मिळवा.. आपल्याकडे आहेच काय? आता जग जिंका, त्यासाठी पुढे या.. अजून कुणाला काही हवंय का सांगा?

एक अबला पुढे आली, नग्न धिंड निघाल्याचं सांगू लागली..

माणसं वखवखलेली होती.. हवं तसं नासवत होती..

त्यांच्यात ती एकटीच.. वेदनेच्या पलीकडे विव्हळत होती नुसतीच

कुठे होते तुमचे चक्रवर्ती सम्राट? जगभर फिरण्याचा सुरुय थाटमाट

हे ऐकून दवंड्याही गोंधळला अन् पुन्हा सावरला. ऐका हो ऐकाSS.. नारी सन्मान हीच आमच्या सम्राटांची शान. अफवा पसरवणं थांबवा.. चक्रवर्ती सम्राटांना घालून-पाडून बोलणं थांबवा.. गोड बोला अन् सुखात राहा... सब के अच्छे दिन आले होSS

Gofan Article
गोफण | बिहारपुरीच्या पलटू चाचांचा उधारराजेंना फोन
Gofan Article
गोफण | निमंत्रण मिळालं अन् ते खुश झाले...
Gofan Article
गोफण | आठ महिन्यांनंतर खुर्ची कुणाची? कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
Gofan Article
गोफण | नमोशेठ हिंदुळेंना जेव्हा रडण्याची संधी मिळाली...
Gofan Article
गोफण | दादांचं उलट टपाली उत्तर! म्हणाले, देवाभाऊ...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com