
उजाडलं होतं. दिल्लीतल्या उंची महालामध्ये एका मऊसूत गादीवर मोटाभाई गुजराती शांतपणे पहुडले होते. चेहऱ्यावर वरवर निश्चल भाव असले तरी आतमध्ये वादळ आलं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. रात्रभर झोप झालेली नसल्याने डोळ्यांच्या पोटऱ्या सुजल्या होत्या. याही परिस्थितीत त्यांनी डोळे गच्च मिटून झोपण्याचा प्रयत्न केला पण काही फरक पडला नाही.