गोफण | येवल्याचे गगन तात्या नांदगावच्या कांदे मामांवर भारी

Gofan Satire Article: येवल्याचे गगन तात्या हळूवार कांदे काढत होते. तेवढ्यात एक गृहस्थ तिथे आले. आडदांड देहयष्टी, पांढरा अंगरखा अन् पांढरीच पँट, गळ्यात भगवा शेला.. रागातच माणूस काकरीत घुसला. नांदगावचे कांदे मामा होते ते. डोक्यात सनक् बसली होती त्यांच्या. 'गद्दारांना सोडत नसतो'असं म्हणत त्यांनी गगन तात्यांना हाक दिली.
sakal gofan article
sakal gofan articleesakal
Updated on: 

ऑक्टोबर हीट भाजून काढत होती. कांदा काढणीला आला होता. पातींनी स्वतःहून पिवळं होत कांद्यांना आपल्यापासून वेगळं करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच नाशिकचे गगन तात्या येवल्यात मुक्कामी आले होते. तात्या तसे मुंबईतच वास्तव्याला असत, कधीतरी नाशकात दर्शनाला जावं तसं जात अन् असं कांदा काढणीला आला की हमखास येवल्यात असत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com