ऑनलाइन शिक्षणासाठी उपयुक्त "गूगल क्‍लासरूम' 

राजकिरण चव्हाण
Thursday, 17 September 2020

शिक्षक शिकवताना वेगवेगळे ई-साहित्य वापरू शकतात; जसे की गूगल डॉक्‍स, पीपीटी स्लाईड शो, गूगल स्प्रेडशीट, पीडीएफ आदी. या गोष्टींच्या माध्यमातून शिक्षक आणि मुलांमध्ये इंटरॅक्‍शन घडलं जातं. आपापसात सामूहिक वा वैयक्तिक संवाद करण्यासाठी "स्ट्रीम' ऑप्शनचा वापर केला जातो. शिक्षक आपली रोजची तासिका गूगल कॅलेंडरमध्ये ऍरेंज करतात. 

सध्याच्या लॉकडाउन काळामध्ये शिक्षणात ज्या ऍप्लिकेशनचा वापर जोरात सुरू आहे, ते म्हणजे "गूगल क्‍लासरूम'. हे एक असं ऍप्लिकेशन आहे ज्या माध्यमातून मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाची कवाडं अजून चांगल्या पद्धतीनं खुली झाली आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गासाठी आपण क्‍लासरूम तयार करू शकतो. यासाठी आपल्याला प्रत्यक्ष घर सोडून कुठं जाण्याची आवश्‍यकता नाही. गूगल क्‍लासरूमचा वापर करून शिक्षक-विद्यार्थी यांची "शिकवणं आणि शिकणं' ही प्रक्रिया पार पाडता येते. यात क्‍लासचे शिक्षक आपली (व्हर्च्युअल) क्‍लासरूम तयार करतात आणि या शिक्षकाकडून दिलेल्या क्‍लास कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं असतं. 

शिक्षक शिकवताना वेगवेगळे ई-साहित्य वापरू शकतात; जसे की गूगल डॉक्‍स, पीपीटी स्लाईड शो, गूगल स्प्रेडशीट, पीडीएफ आदी. या गोष्टींच्या माध्यमातून शिक्षक आणि मुलांमध्ये इंटरॅक्‍शन घडलं जातं. आपापसात सामूहिक वा वैयक्तिक संवाद करण्यासाठी "स्ट्रीम' ऑप्शनचा वापर केला जातो. शिक्षक आपली रोजची तासिका गूगल कॅलेंडरमध्ये ऍरेंज करतात. त्याचबरोबर गूगल फॉर्ममधील क्वीझचा वापर करून मुलांना कितपत समजलं? याची पडताळणीसुद्धा करू शकतात. 

क्‍लासवर्क अर्थात वर्गकार्य देण्यासाठी असाइन्मेंट, प्रश्नावली, अन्य साहित्य देता येते. वर्गकार्य पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी शिक्षकांना परत पाठवू शकतात. त्या वर्गपाठाला शिक्षक तपासून गुण देखील देऊ शकतात. काही अडचणींमुळे शिक्षकांना वर्गकार्य देण्यात अडचण येणार असेल तर ते पूर्वीच शेड्यूल करून पाठवू शकतात. जेव्हाचा वेळ सेट केला आहे त्या वेळी ते शेड्यूल केलेलं वर्गकार्य पोचेल. तसंच मुलांना अभ्यास पूर्ण करण्यासाठी टाईम लिमिट देखील देता येतं. क्‍लासरूम ऍप्लिकेशनच्या इयत्तेतील विषयानुसार वेगवेगळे क्‍लास केले जातात. प्राथमिक शाळेत एकाच शिक्षकाला सर्व विषय शिकवावे लागतात. सध्याच्या काळासाठी शिक्षक - विद्यार्थी यांच्यासाठी "गूगल क्‍लासरूम' वरदानच ठरली आहे, असं मला वाटतं. 

- राजकिरण चव्हाण, 
राज्य तंत्रस्नेही शिक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

इतर ब्लॉग्स