गूगल मीट : विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणातील एक सुरक्षित व मोफत पर्याय! 

Google Meet
Google Meet

सध्याच्या लॉकडाउन काळात सर्वजण घरांत आहेत आणि प्रत्येकजण घरून काम करीत आहेत. या कारणास्तव प्रत्येकजण व्हिडिओ कॉलिंग वापरत आहे. आपणास माहीत असेल, की व्हिडिओ कॉलिंग मीटिंगसाठी बरेच लोक झूम ऍप वापरत होते. पण झूम ऍपवरून डेटा लिक होण्याच्या बातमीनंतर भारत सरकारकडून त्याचा वापर करू नका, असं सांगण्यात आलं. त्यामुळं प्रत्येकजण Google ऍप वापरत आहे; कारण ते गूगलचं उत्पादन आहे, प्रत्येकजण यावर अधिक विश्वास ठेवतो. त्यामुळं ऑनलाइन शिक्षणात शिक्षक-विद्यार्थ्यांकडून व्हिडिओ मीटिंगसाठी गूगल मॅप मीट जास्त प्रमाणात वापरलं जात आहे. 

गूगल मीट ऍप हे एक Google चं उत्पादन आहे, जे आपण विनामूल्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरू शकता. झूम ऍपला हा एक उत्तम पर्याय आहे. या ऍपवर आपण एकाच वेळी 200 हून अधिक लोकांसह व्हिडिओ मीटिंग करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण आपल्या जी-मेलद्वारे थेट Google वापरू शकता. जर आपण लॅपटॉप वापरत असाल तर आपल्या कोणत्याही ब्राउझरमध्ये जी-मेलमध्ये लॉग इन केल्यानंतर आपणाला Google पर्याय डाव्या बाजूला दिसेल. आपण डायरेक्‍ट लोगोवर क्‍लिक करून गूगल मीट वापरू शकता. 

Google आपण Windows, IOS आणि स्मार्ट फोनवर वापरू शकता. जर आपण याआधी झूम ऍप वापरला असेल तर आपल्याला अडचण नाही. सर्वप्रथम आपल्याला Play Store वरून Google ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल. इन्स्टॉल केल्यानंतर आपण कॅमेरा आणि मायक्रोफोनसह उघडताच आपल्याला काही परवानग्या विचारल्या जातात. त्यानंतर आपणास लॉग इन करण्यास सांगितले जाईल, जे आपण Google खात्याद्वारे लॉग इन करू शकाल. 
एकदा आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याकडं आणखी एक नवीन स्क्रीन असेल, ज्यावर आपल्याला न्यू मीटिंग आणि एंटर मीटिंग कोड हे पर्याय दिसतील. आपणास मीटिंग सुरू करायची असल्यास स्टार्ट मीटिंगवर क्‍लिक करू शकता आणि नवीन मीटिंग सुरू करू शकता. त्याची दुवा दुसऱ्याला पाठवू शकता आणि त्या व्यक्तीला सहभागी करू शकता. आपण कोणत्याही मीटिंगमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर इन्व्हिटेशन कोड असेल तर तो कोड टाकून मीटिंग जॉईन करू शकता. 

न्यू मीटिंग : 
आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी कॉन्फरन्सिंग मीटिंग सुरू करू इच्छित असल्यास स्टार्ट मीटिंगवर क्‍लिक करा आणि मीटिंग सुरू करू शकता, त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना यात सहभागी करू इच्छित असल्यास अशा प्रत्येकास मीटिंग लिंक शेअर करू शकता. 

जॉईन मीटिंग : 
कोणत्याही बैठकीत सामील होऊ इच्छित असल्यास आपण जॉईन मीटिंग या पर्यायावर क्‍लिक करून त्यात मीटिंग कोड टाकावा. आपण एकाच वेळी 250 लोकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील करू शकतो. 

Google Meet चा सर्वांत चांगला फायदा हा आहे की, तो सर्वांत सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप असून तो देखील विनामूल्य आहे. शिक्षणात तंत्रज्ञान वापरासंदर्भात एक उपयुक्त असा पर्याय आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

- राजकिरण चव्हाण
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाउंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com