

Blog
esakal
विजय नाईक, नवी दिल्ली १ जून, २०२६
२८ मे २०२६. घरून निघालो, तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी एतिहाद चे दिल्ली ते अबु धाबी उड्डाण होते. इराण-अमेरिका युद्धबंदी झालेली नसली, तरी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराण विरूद्ध अमेरिका व इस्त्रायल दरम्यान सुरू झालेल्या युद्धाची तीव्रता बरीच कमी होऊन आखाती देशांच्या विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याने यंदा आम्ही अबू धाबी मार्गे एटलांटा (जॉर्जिया) ला जाण्याचे ठरविले.