
Christianity In India : भारतीय समाजव्यवस्थेत दलितांना किंवा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांना पौरोहित्याचे अधिकार नसायचे, आजही नाहीतच.
ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर मात्र या उपेक्षित समाजघटकांना धर्मगुरू होण्याचे आणि पर्यायाने धर्मग्रंथ वाचण्याचे, शिकवण्याचे अन पौरोहित्याचे इतर सर्व अधिकार मिळाले.
महाराष्ट्रात या समाजातील पहिले धर्मगुरू होण्याचा मान भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे अस्पृश्यता कायद्याने गाडण्याआधीच मिळाला.
नगर जिल्ह्यातील राहुरीजवळच्या चिंचोळे गावचे जोसेफ मोन्तेरो हे १९३० साली कॅथोलिक धर्मगुरू बनले.