Corona Virus : कोरोनावर मात करण्यासाठी होमेओपेथीला संधी मिळणे गरजेचे

Coronavirus
Coronavirus

कोरोना व्हायरस किंवा कोवीड 19 या विषाणूजन्य आजाराने जगात लाखो लोक पीडित असून हजारो लोक यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. याचा उगम चीन या देशातील वूहान प्रांतातून झाला असून जगातील हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच देश या विषाणू संसर्गापासून वाचले आहेत.विषाणूचे संहारक स्वरूप पाहता विविध विषाणूजन्य आजारावर जागतिक स्तरावर जगातील मान्यताप्राप्त सर्व चिकित्सा पद्धतीने एकत्र येवून औषधोपचार करणे गरजेचे आहे. 

आपल्या देशात बहुतांशी राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आला असून प्रत्येक राज्यात याचे रुग्ण आढळत आहेत. आपल्याकडे केंद्र व राज्य शासनाने आजार फैलावू नये म्हणून जनता कर्फ्यु , संचारबंदी, मास्क वापरणे, प्रत्येक वेळी हात साबणाने धुणे, सॅनिटाइझर वापरणे आदी प्रति- बंधात्मक उपाययोजना केल्या. मात्र देशलोकसंख्या व त्या तुलनेत उपलब्ध डॉक्टर्स, व्हेंटिलेटर तसेच  साधन सुविधा यांची संख्या पाहता या पद्धतीने आजारास रोखणे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. या आजाराचा सामना करताना शासनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आपले पारंपरिक शास्त्र आयुर्वेद, निसर्गोपचार व युनानी, होमिओपॅथी या जर्मन शा्स्त्रांकडे दुर्लक्ष केले.आयुष मंत्रालयाने जिनस इपीडेमिकस म्हणून आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथिक औषधाचे नावघोषित करण्यापलीकडे काही केले नाही. कोरोना ही राष्ट्रीयआपत्ती असताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष होमिओपॅथीचा अभ्यास न करता हे औषधप्रमाणित नाही असे आपल्या मुलाखतीतून सांगतात, हे वस्तुस्थितीस धरून नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र कोरोनाफोबिया वाढीस लागला असून या आणीबाणीच्या परिस्थितीत सर्व आरोग्यशास्त्रांनी एकत्र येवून मृत्युदर कमी करणे तसेच विषाणूजन्य आजार पुन्हा मानवी आयुष्यास घातक ठरू नयेत अशी कायमस्वरूपी उपाययोजना करणे यास सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी देशाचे प्रतिनिधी, सर्व चिकित्सा पद्धतीचे डॉक्टर्स , संशोधक यांच्या प्रचंड सकारात्मक इच्छाशक्तीची आज खरी देशास गरज आहे. 

विषाणू व जिवाणू हे मानवी जीवनास वरदानतसेच अपायकारक आहेत. मानव, जिवाणू व विषाणू हे पृथ्वीतलावर अनाधिअनंत काळापासून असून त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल होत आहेत. सार्स, एच. आय. व्ही, इबोला, निपाह या विषाणू पेक्षा कोरोनाचा मृत्युदर कमी आहे मात्र, विविध व्याधींनी ग्रस्त जेष्ठ नागरिक कोरोनामुळे मरण्याचे प्रमाण जास्त आहे. या विषाणूजन्य आजारावर आतापर्यत कोणताही रामबाण उपाय नाही मात्र, होमिओपॅथी संधी मिळाल्यास संपूर्ण जगास वरदान ठरू शकते. कारण ही पद्धत रोग लक्षणे, रुग्णाची मानसिक, शारीरिक व सामाजिक स्थिती लक्षात घेऊन तसेच व्यक्ती तितक्या प्रकृती व प्रकृती तितक्या विकृती या तत्वाने काम करते. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्ण बरे होतात. मात्र आधुनिक चिकित्सा पद्धत यास प्लेसिबो इफेक्ट मानते, मात्र या चिकित्सापद्धतीचे अनेक डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय, नातलग, होमिओपॅथी चिकित्सा पध्दतीने बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली, त्यांना कोरोनाची लागण होत नाही तसेच, झाल्यास ते लवकर बरे होतात. त्यामुळे होमिओपॅथी औषधांची परिणामकारकता अनुभवण्याची संधी शासनास उपलब्ध झाली आहे.

कोरोना रुग्ण विलगीकरण केल्यानंतर त्याची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यासाठी अल्फाअल्फा, अव्हेना सटाव्हा, जिनसेंग,चायना ऑफिसिन्यालीस, इकनेशिया, हायडास्ट्रीस,  मानसिक ताण कमी करण्यासाठी अकोनाइट, अर्निका, आर्सेनिकम अल्बम, लायसीन, अग्नस कास्ट, बोराक्स, नायट्रम मुर, अर्जेन्टम नायट्रीकम, तापासाठी अकोनाइट, बेलाडोना, ब्रायोनिया,फेरम फास, पायरोजन, घसादुखीसाठी मर्कसोल, रुमेक्स, बरायटा कार्ब, पल्सटीला, वायथीया, दम लागून खोकला येत असेल तर कलकेरीया कार्ब, अर्स आयोडाईड, अँटीम टार्ट, काली कार्ब, ऍस्पिडो- स्पर्मा, ग्रीनडेलिया, सीनेगा, जस्टीसिया तर जीवनशक्ती कमी होत असेल तर कार्बो वेज, कॅम्परो, आर्सेनिकम अल्बम व इतर औषधी उपलब्ध आहेत मात्र, डॉक्टरी सल्ल्याशिवाय ती घेऊ नयेत. मात्र होमिओपॅथिक औषधांचा वापर झाल्यास अनेकांचे प्राण वाचण्यास निश्चित मदत होईल यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com