

Blog
esakal
विजय नाईक,
‘ येत्या १५ जून नंतर होर्मुझ सामुद्रधुनीची दुहेरी कोंडी अशीच चालू राहिली, तर जग मोठ्या आर्थिक संकटात लोटले जाईल’, असे मत भारताचे संयुक्त अरब अमिरात, इजिप्त व ऑस्ट्रेलियातील माजी राजदूत यांनी नवदीप सुरी यांनी व्यक्त केले आहे.
अलीकडे दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेन्टर’ मध्ये ‘स्कॉलर्स ग्रूप’ने आयोजित केलेल्या अनौपचारिक बैठकीत ते बोलत होते.
होर्मुझ हा शब्द मूळ झोरस्ट्रीय भाषेतील ‘हुरामाझदा’ या शब्दापासून आला. याचा अर्थ ‘बुद्धिदेवता (अहूरा माझ्दा)’. ते म्हणाले, “या कोंडीचे भारतावरही विपरीत परिणाम होतील. याची कल्पना अद्याप आपल्याला आलेली नाही, परंतु, त्याची झळ देशातील प्रत्येक नागरीक व क्षेत्राला लागणार आहे. ते आव्हान झेलण्यासाठी देश, सरकार सिद्ध आहे काय, याचे उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही.’’