Cabinet Secretary T. V. Somanathan highlights different work styles in the Indian bureaucracy and stresses the need for administrative reforms.
esakal
२६ ऑक्टोबर रोजी भारताचे कॅबिनेट सचिव टी.व्ही, सोमनाथन यांनी नोकरशहांचे किती प्रकार असतात यावर जळजळीत पण हसी मजाक करीत प्रकाश टाकला, तो ही ज्येष्ठ नोकरशहांच्या बैठकीत.
त्यांच्या मते नोकरशहांचे बारा प्रकार किंवा तर्हा आहेत. त्या विषयीचे प्रेझेन्टेशन करताना सोमनाथन यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार कै लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची मदत घेत त्यांचे वर्णन केले. त्यांचा उद्देश ढेपाळलेल्या नोकरशहांचे केवळ चिमटे काढणे, हा नव्हता, तर कार्यक्षमतेचे महत्व त्यांना पटवून देणे, हा होता. त्यातील काही नोकशहांच्या तर्हा त्यांनी विशद केल्या, त्या अशा -
1) फायली फेकून देणारे व उद्धटपणे बोलणारे २) फायली दाबून ठेवणारे, त्यावर निर्णय घेण्यास विलंब लावणारे ३) कर्मचाऱ्यांना शनिवारी कामावर बोलविणारे, पण स्वतः मात्र त्याच दिवशी उशीरा कार्यालयात येणारे ४) ऑफिसची व कामाची वेळ संपल्यावर सायंकाळी सात वाजता मिटींग बोलविणारे ५) स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार असताना उठसूठ मंत्र्यांकडे त्याबाबत फाईल पाठविणारे ६) एखादा दस्तावेज पाहायचा असेल, तर तो पाहण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांशी जवळीक करण्याच्या उद्देशाने त्यांना जवळ बसवून कागदपत्र वा फाईल पाहाणारे.