

Indian Ocean From Peace to Conflict Understanding China India Rivalry Maritime Trade Routes and Growing Regional Security Challenges
esakal
दिल्लीतील ‘सोसायटी फॉर इंडियन ओशन स्टडीज’च्या विद्यमाने १३ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टरमध्ये ‘मारिटाईम डायलॉग’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
हिंदी महासागर परिसराची सद्यस्थिती, त्यातून चालणारा व्यापार, अमेरिकेने इराणवर लादलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, महासागरातून होणारी चाचेगिरी, सागरी दहशतवाद, मानवी व नशील्या पदार्थांची तस्करी, वाढलेल्या स्पर्धा, संघर्ष, महासागराचे सशस्त्रीकरण (वेपनायझेशन), सुरक्षा, त्यावर अवलंबून असणारी राष्ट्रं व त्यांच्या व जगापुढे निर्माण होत असलेल्या समस्या आदींवर नोदलातील उच्चाधिकारी, राजदूत व तज्ञांतर्फे प्रकाशझोत टाकण्यात आला.