Smile Day: सहजच सगळे हसत जगुया चला… हास्यदिनाच्या निमित्ताने..

World Laughter Day 2026 Spread Smiles and Happiness: आंतरराष्ट्रीय हास्यदिन २०२६; हसण्याचे हे फायदे माहिती आहेत का? सहज हसा, आनंदी राहा!
World Laughter Day 2026 Discover How Laughter Helps Reduce Stress Improve Mood and Make Everyday Life Happier

World Laughter Day 2026 Discover How Laughter Helps Reduce Stress Improve Mood and Make Everyday Life Happier

esakal

Updated on: 

नवीन घर घेतलं, गाडी घेतली , चार नवीन गोष्टी घरात घेतल्या कि आपल्या सगळ्यांना आनंद होतो; हा आनंद किती काळ टिकतो ?

अशा प्रकारचं येणारं हसू हे टिकतं दीर्घकाळ ?

चेहऱ्यावरचं हसू टिकावं दीर्घकाळ यासाठी शरीराबरोबरच मनही आनंदी राहायला हवं.

मन आनंदी रहावं आणि चेहऱ्यावर हसू दीर्घकाळ टिकावं यासाठी आंतरराष्ट्रीय हास्य दिनाच्या मुहूर्तावर ठरवूया काही गोष्टी.

१. दैनंदिन जीवनातील छोटे-छोटे आनंद शोधूया आणि जपूया.

२. आपल्या आनंदाची व्याख्या आपणच करावी आणि प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या वेगळी असते, हे समजून घ्यावं.

३. आनंद आणि हसू यांच्यातील परस्परसंबंध ओळखावा.

४. स्वतःशी असलेल्या आपल्या निकोप नात्यातून हा आनंद आणि हे हसू आपण सहज साध्य करू शकतो. उदाहरणार्थ, ताक घुसळताना अचानक वर आलेलं लोणी चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतं. सकाळचा होणारा सूर्योदय काही वेगळंच समाधान देऊन जातो, गाडी पार्किंग मध्ये पहिल्याच प्रयत्नात अचूक लागली, की होणारा आनंद काही औरच असतो.

Loading content, please wait...