
Jayant Narlikar Eminent Astrophysicist: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचे २० मे २०२५ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञान आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नारळीकर यांनी आपल्या संशोधन, शिक्षण आणि लेखनातून विज्ञानाला सामान्य माणसापर्यंत पोहोचवले आणि तरुणांना प्रेरणा दिली.