Katyayani Devi, Navratri Day 6,
esakal
कात्यायनी: आज नवरात्रीचा सहावा दिवस! या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करतात. देवी भागवतात कात्यायनी देवीची कथा वर्णिलेली आहे. 'कत' नावाच्या प्राचीन कुळात 'कात्यायन' नावाचे तपस्वी महर्षी होऊन गेले. कात्यायन ऋषींनी आदिशक्ती जगदंबा देवीची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांना 'तुझ्या इच्छेनुसार मी तुझ्या घरी योग्य वेळी तुझी कन्या म्हणून प्रकट होईन' असा वर दिला. कात्यायन ऋषींना खूप आनंद झाला.
दरम्यानच्या काळात महिषासुर नावाच्या म्हैस किंवा रेड्याच्या रूपातील दानवाला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की,'त्याला कोणताही पुरुष मारू शकणार नाही.' या वराने महिषासुराने