
Trump's Claims vs. India's Silence: A Diplomatic Dilemma.
Sakal
Modi's Strategic Silence : वरच्या शीर्षकाच्या नेमका उलटा प्रश्न म्हणजे ``कोण खरं बोलतय.’’ जे स्वतःचा वारंवार प्रचार करतात, त्यांना खोट्याचं खरं करायच असतं, अथवा लोकांना तसं भासायला हवं, असा त्यांचा प्रयत्न असतो. अनेक वेळा खऱ्या सारखं खोटं बोललं, की लोकांना निदान असं वाटायला लागतं, की हा इतक्या वेळा सांगतोय, याचा अर्थ त्यात काहीतरी तथ्य असावं. राजकीय प्रचार अर्थात प्रपोगंडा याचं तेच लक्ष्य असतं. अनेकदा ते साध्य होतं. लोकांच्या मानसावर आपला बाण अचूक लागला, याचं समाधान राजकीय नेता, राजकीय पक्ष यांना मिळतं.