राहून गेल्या पाऊलखुणा..!

- ऋत्विज चव्हाण, सोलापूर
Saturday, 6 June 2020

प्रत्येक क्षण जगण्यासाठीचा संघर्ष करणाऱ्या या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव सुख पावले टाकत पुढे सरकायचा प्रयत्न करतो. आयुष्याच्या वाटेवर अनेक चुका होऊन जातात. प्रश्न मागे पडले की उत्तरे मिळत नाहीत आणि उत्तर शोधले की की प्रश्न बदललेला असतो.

कोकणात, सूर्य आग ओकत होता. उन्हामुळे चांगलाच पारा चढला होता. जमीन चांगलीच तापली होती. चाळीशीच्या पुढे गेल्याने, सर्व जणांची त्राही त्राही झाली होती. अशातच एक संध्याकाळी ढग दाटून आले. वाटले आता शांत पाऊस पडून मन अल्हाददायक होईल, त्यांनी सर्वांनाच निराश केले. अपराजित न होता दुसऱ्या दिवशी ढग पुन्हा दाटून आले. टप टप करत पाऊस सुरु झाला. आजही तो थेंबांचा आवाज आठवत आहे. अलगद जमिनीवर पडणारे थेंब पाहून रहावले नाही मी क्षणात पुढे सरकलो. त्या थेंबांच्या गर्दीत जाऊन पोहोचलो. क्षणात पावसाने जोर धरला मातीतल्या मागे राहिलेल्या पाऊलखुणा मला खूप काही सांगून गेल्या, आयुष्यात आपण चालत असतो. माती, चिखल, जमिनीवरील प्रत्येक पावलांची खूण काहीतरी मनाला विचाराधीन करत असताना पाऊस जोर धरतो, आणि पाऊलखुणा मिटत जातात. आयुष्य सुद्धा या पाऊलखुणा सारखी आहे. चाललं की मागे राहतात आणि वळून पाहिलं की त्या अनुभवाचे बोल बोलतात. पावसाने पाऊलखुणा मिटल्या खऱ्या परंतु मनुष्याच्या आयुष्यातील चांगले - वाईट, सुख - दुःख मीटतेच असे नाही. हे मन खूप मोठी आहे, सर्वांनाच मनाची श्रीमंती आहे. देवाने काहीना ती दाखवली तर काही दाखवू शकत नाहीत. इथे सुख दुःखाच्या खेळात मनात इतका हरवला आहे की भविष्याची चिंता त्याला सोडत नाही आणि भूतकाळ विसरू देत नाही. ही जणू आपल्या पाऊलखुणा..! 

कोकणात फिरताना , सुंदर अशा मातीच्या रस्त्यावर चालताना सोबती हवासा वाटतो. एकटेपणाचा स्पर्श, तो भाव कोणाची तरी आठवण काढत असावा खरा! लाल माती पाण्याच्या थेंबा मुळे अधिकच सुहासी झाली. जमिनीचा तो सुगंध अनेकांना भावून जातो. त्यात पाण्यात नाहलेली झाडे ते पान हिरवळ अगदी पारणे सुखद करून जाते. झाडातून आतून वाट काढत मी पुढे सरकलो पोहोचलो ते थेट काकांच्या चहाच्या टपरीवर. चहाचा हलका घोट घेत मी डोंगराकडे पहात होतो तेव्हा ढगांची गर्दी आणि थेंबाचे बरसने या डोंगर नाहुं निघाला होता. डोळ्यात भरावे असे ते चित्र जणू चित्रकाराचे, कवीचे, लेखकाचे स्वप्न होते. 

पाऊस पडत होता कांदा भजी चा वास दरवळत होता. थोडा ताव मारून मी पुन्हा घराकडे निघालो थंडा वाढल्याने प्राणी आणि पक्षी सुखावले होते. ते पक्षांनी नि संध्याकाळची घरची वाट धरली. मीही घरचा रस्ता धरला. घरी जाताना पावसाचे पाणी हलकीशी मातीतून वाट काढत पुढे सरकत होते. हे जसे की भविष्याची वाट काढत माणूस पुढे सरकतो. संध्याकाळ संपून रात्र झाली. पाऊस पडत होता पण थोडी भाकरी चटणी खाऊन मी आंथरुन पसरले आणि विचाराच्या आधीन होऊन झोपलो खरा, परंतु त्या पहिल्या पावसाच्या आठवणी काही मनातून जात नव्हत्या. सुखद आठवणींचा ध्यास धरत मी झोपलो खरा पण तेवढ्यात जोरात आवाज आला. पावसाने जोर धरला विज, वारा ,पाऊस यांचा खेळ कदाचित भयानक आणि विध्वंसक रूप धारण करणार होता, असे जाणवले. मनात धडकी भरली, रात्रभर पाऊस पडत होता. जोराचा वारा जणू वादळ. हिम्मत करत पुन्हा डोळ्यांना झोपण्याचा आदेश दिला. 

सकाळ झाली, मनात किती ती भिती चाहूल देत होती. शेजार त्यांची बोलली ऐकू येत होती. ती बाहेर येऊन पाहतो तर काय निसर्गाने प्रकोप केला होता. गुडघाभर पाणी त्यातून वाट काढत मी पुढे सरकलो. झाडे पडली होती, ती काकांचे चहाचे दुकान आता राहिले नव्हते. हे निसर्गाचे रूप मी अनुभवले. आयुष्याच्या वाटेवरील चांगल्या पाऊलखुणा मिटल्या होत्या. खऱ्या त्या जागी होती ते फक्त नुकसान आणि अनुभवाचे रूप. कोकणात राहतानाचा हा अनुभव मी विसरू शकत नाही. जणू माझ्या मनाच्या आठवणींनी कायमची जखम केली असावी, थोडे सावरत पाणी उतरू लागले. काकांनीही आपले चहाचे दुकान सावरले आणि पुन्हा व्यवसाय सुरू केला. लाल माती ओली झाली होती. ती वाळायला वेळ लागणार होता, जणू आयुष्यातील काही अनुभव, क्षण, घटना आपल्याला विसरायला वेळ लागतो. वर्तमान जरी सुख शोधले तरी भविष्य काळावर आपले नियंत्रण कोठे आहे ? हे भूतकाळ पाठ सोडत नाही. तरी प्रत्येक क्षण जगण्यासाठीचा संघर्ष करणाऱ्या या पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव सुख पावले टाकत पुढे सरकायचा प्रयत्न करतो. आयुष्याच्या वाटेवर अनेक चुका होऊन जातात. प्रश्न मागे पडले की उत्तरे मिळत नाहीत आणि उत्तर शोधले की की प्रश्न बदललेला असतो. अशा अनेक चुका आयुष्यात होतात पावला गणित आयुष्य बदलत जाते प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव येतो आणि आपणास खूप काही शिकवून जातो. आपल्या पाऊलखुणा आपणास पुढे सरकतात आयुष्याच्या वळणावर मागे ठेवतात त्या आठवणी आणि तेव्हा कधीकधी राहून जातात त्या फक्त पाऊल खुणा.  

 महाराष्ट्र
 

इतर ब्लॉग्स