संकटांना सामोरे जायला शिकू या !

 learn to deal with adversity
learn to deal with adversity

आत्महत्या ही एक ज्वलंत सामाजिक समस्या आहे. आत्महत्येमागे विविध बाबी कारणे असू शकतात. खरे तर आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे आणि कायद्यानेही गुन्हा आहे; मात्र तरीही हे टोकाचे पाऊल उचलले जाते. अशा कृत्याने कुटुंब उद्‌ध्वस्त होऊ शकते. कोरोनामुळे देशावर मोठे संकट कोसळले. अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत... अनेकांचे आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यही धोक्‍यात आले आहे. याचे दूरगामी परिणाम सर्व क्षेत्रांवर होणार आहेतच.

कोरोनाच्या संकटामुळे तीन वेळा लॉकडाउनचा कालावधी वाढला. या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले, तर अनेकांनी स्टे ऍट होम, वर्क फ्रॉम होमसारख्या माध्यमांतून जगण्याचे चक्र सुरू राहण्यासाठी प्रयत्न केले, तरीही अनेक लोकांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. परजिल्हा व परराज्यातील बरेच लोक इतर राज्यात अडकून पडले. लोकांना भविष्याची, उदरनिर्वाहाची चिंता सतावत होती. लॉकडाउनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेकांना नैराश्‍याने ग्रासले. काहींचे मानसिक खच्चीकरणही झाले. आर्थिक कोंडीमुळे घुसमट झाली. यातून बाहेर पडण्यासाठी जरी मार्ग सापडत नसला तरी त्यातून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल मुळीच उचलण्याची आवश्‍यकता नाही. यातून कशाप्रकारे मार्ग काढता येईल, यावर शांतपणे विचार करण्याची आवश्‍यकता आहे. प्रत्येकाने सकारात्मक विचार करून यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पराभूत मनोवृत्तीने संकटाला सामोरे जाण्यापेक्षा संकटांचा सामना निडरपणे करण्यासाठी स्वतःला तयार करणे अत्यंत आवश्‍यक आहे.

याबाबत इंडियन सोशॅलॉजिकल सोसायटीचे सेक्रेटरी प्रा. डॉ. जगन कराडे म्हणतात, "ऑरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याचा आनंद व दु:ख हे समाजाला धरून असते. लॉकडाउनच्या काळात माणसं समाजापासून अलिप्त राहिली. अशा परिस्थितीत काहींच्या मनात नकारात्मक मानसिकता तयार होत असते. लॉकडाउनचा कालावधी जास्तच वाढल्याने अनेकांना भविष्याची चिंता लागून राहिली. आतापर्यंत आपण जी जीवनशैली अंगीकारत आलो आहोत, येथून पुढे तशी जपता येणार नाही, आपली नोकरी गेली तर आपल्या कुटुंबाचे काय होणार, अशा प्रश्‍नांची मालिका तयार झाली. आर्थिक स्थिती अत्यंत खालवत गेली तर दडपण येण्याची मानसिकता तयार होते. अशा नकारात्मक मानसिकतेतून टोकाचे पाऊल उचलले जाते; मात्र त्यावर सकारात्मक विचारांचे सातत्याने शिंपण केल्यास या टोकाच्या पाऊल उचलण्यापासून अनेकांना माघारी ओढता येणे नक्कीच शक्‍य आहे. विशेषतः तरुणांनी येणाऱ्या संकटांना सकारात्मक विचारांनी सामोरे जाऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे, हेच भविष्यकाळातील मोठे आव्हान असणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com