
परवा एका कार्यक्रमानिमित्त अचानक क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्याशी संवाद घडला. 'शब्दसेवा' या नव्या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशनासाठी ते व्यासपीठावर असणार होते. मासिकाचे प्रकाशक व्हाईट लाईट पब्लिकेशन्सचे जॉर्ज काळे यांनी मलाही तिथे बोलण्यास सांगितले होते.