Update News: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

Candle March
Candle Marchsakal media

शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुलवामामध्ये कँडल मार्च

जम्मू-काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद झाले होते. भारताच्या या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुलवामातील नागरिकांनी कँडल मार्च काढला.

संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी काँग्रेसचा खासदारांना व्हीप, १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान राहावं लागणार हजर

संसदेचं विशेष अधिवेशन १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान बोलवण्यात आलं आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे.

विरोधकांना देशात विकास नको आहे- पियुष गोयल

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल म्हणाले की, विरोधकांना देशात विकास नको आहे.

आझाद मैदानात मराठा आंदोलकांची तब्येत बिघडली

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु होतं. आंदोलन सुरु असताना काही आंदोलकांची तब्येत बिघडली. यावेळी डॉक्टरांनी येऊन त्यांची तपासणी केली.

मुंबई विमानतळावरील रनवे उड्डाणासाठी खुला

काहीवेळापुर्वी मुंबई विमानतळावर खाजगी विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर तो रनवे आता पुन्हा उड्डाणासाठी खुला करण्यात आला आहे.

मुंबई विमानतळावर खाजगी विमानाचा अपघात, अपघातात ३ लोक जखमी

मुंबई विमानतळावर एका खाजगी विमानाचा अपघात झाला. अपघात झाल्यावर हे विमान दोन तुकड्यांमध्य विभागलं गेलं. यावेळी प्रवास करताना या विमानात ८ प्रवासी असल्याचे माहितीतून समोर आले आहे. यापैकी ३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट योग्य आकारात आहे-मुथय्या मुरलीधरन

श्रीलंकेचे माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने आयपीएल स्पर्धेची स्तुती केली. ते म्हणाले की, "आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट योग्य आकारात आहे. "

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नये-नारायण राणे

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी नारायण राणे यांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी नारायण राणे म्हणाले की, "मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत. ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. "

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुलीला ईडीचे समन, दिल्ली दारु घोटाळ्याशी संबंध

दिल्ली घोटाळ्यात रोख रकमेची देवाणघेवाण केल्याच्या संबंधातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि बीआरएस पक्षाच्या आमदार के. कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे.

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी नाव उलटली, १४ जण बेपत्ता! बिहारमधील धक्कादायक घटना

Live Update News: न्याय शिंदे गटाला घरी पाठवणारा असेल - भास्कर जाधव

उत्तर दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत द्या, शिंदे गटाची मागणी

कागदपत्रे मिळाली नाहीत,  शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

ठाकरे-शिंदे गट आमदार अपात्र सुनावणीला सुरुवात,  हे आहेत नियम?

शिंदे गट आणि ठाकरे गट आमदार अपात्र प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. आसन क्रमांक 7 ते 11 दरम्यान सर्व जण बसतील. वकील आणि वादी प्रतिवादी हे सुनावणी वेळी पुढे येऊन बाजू मांडतील. अनुक्रमणिका नुसार याचिकाकर्त्यांना बोलावलं जाईल

वकीलामार्फत ज्यांना बाजू मांडायची आहे त्यांना अधिकार पत्र सादर करावे लागेल. भविष्यातील समन्वयासाठी वादी-प्रतीवादी आणि त्यांच्या वकिलांना इमेल आयडी आणि वॉट्स अप नंबर द्यावा लागेल जेणेकरून पुढील माहिती त्यांना व्हाट्सअपद्वारे पुरवली जाईल.ॉ

सुनावमी कक्षात फक्त वादी-प्रतिवादी आणि त्यांच्या वकिलांना परवानगी असेल. इतर कर्मचारी व वकिलांना विना परवानगी प्रवेश मिळणार नाही. कुणालाही रेकॉर्डिंग करण्यास परवानगी नसेल जर कुणी रेकॉर्डिंग केल्यास कारवाई होईल. गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल

आजच्या आमदार अपात्र सुनावणीसाठी कोणते आमदार उपस्थित?

आजच्या आमदार अपात्र सुनावणीसाठी कोणते आमदार उपस्थित?

शिंदे गट आमदार

1. बालाजी किणीकर

2. यामिनी जाधव

3. रमेश बोरणारे

4. भरत गोगावले

5. सदा सरवणकर

6. महेंद्र थोरवे

7. बालाजी कल्याणकर

8. शांताराम मोरे

9. महेंद्र दळवी

10. किशोर आप्पा पाटील

11. विश्वनाथ भोईर

12. प्रदीप जयस्वाल

13. ज्ञानराज चौघुले

14. संजय शिरसाठ

15. दिलीप लांडे

16. योगेश कदम

17. संजय रायमूलकर

ठाकरे गट आमदार-

1. प्रकाश फातर्पेकर

2. अजय चौधरी

3. उदयसिंह राजपूत

4. वैभव नाईक

5. नितीन देशमुख

6. रमेश कोरगावकर

7. भास्कर जाधव

8. राजन साळवी

9. कैलास पाटील

10. सुनील प्रभू

11. सुनील राऊत

12. राहुल पाटील

13. संजय पोतनीस

अपक्ष आमदार

1. नरेंद्र भोंडेकर

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे भूमिका मांडतील

तुमच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही

मराठा समाजाच्या निर्णयाशिवाय इतर निर्णय सुद्धा शिंदे यांनी धाडसांनी घेतले. ते आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत. मी तुम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे मी वागणार, तुमच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यांनी एका महिन्याचा वेळ मागितला. मी सगळ्या समाजाला विश्वासात घेतले, ५० हजारापेक्षा जास्त लोकं उपस्थित होते. मी लोकांशी चर्चा करून सरकारला एका महिन्याचा वेळ दिला.

तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका - मनोज जरांगे

तुमच्या राजकारणासाठी माझ्या पोरांचे वाटोळे करू नका, आम्ही तसले धंदे करत नाहीत.

आम्हाला आरक्षणाशिवाय काही मागणी नाही, वेळ द्या पण आम्हाला आरक्षण द्या अशी मराठ्यांची मागणी आहे.

माझं उभं खानदान कष्टात गेलंय त्यामुळे मी काही गोष्टी सहन करणार नाही.

मी तुमच्या हिताचाच निर्णय घेणार, मी मुख्यमंत्र्यांना इथं आणूनच दाखवलं.

मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला भेट दिल्याची पहिलीच घटना - मनोज जरांगे

एकनाथ शिंदे यांच्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी आरक्षणात लक्ष घातले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला एकनाथ शिंदे हेच न्याय देतील

अखेर १७ दिवसानंतर मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहचले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी पोहचले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. दोन सरकारी अधिकारी देखील आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडाच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार

अंतरवाली सराटी येथे पुढच्या दहा मिनिटांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल होत आहेत. अंकुशनगर येथे मुख्यमंत्री दाखल झाले आहेत.

हिंदू धर्म संपवण्यासाठी INDIA ची युती झाली आहे का? - नितेश राणे

"...आमच्याकडे अशी माहिती आहे की काल दिल्लीत झालेल्या भारत आघाडीच्या बैठकीत 'सनातन धर्मा'वर वक्तव्य केल्याबद्दल द्रमुक नेत्यांचे कौतुक करण्यात आले... ते (INDIA) द्रमुकच्या विधानाचे समर्थन करतात. हिंदू धर्म संपवण्यासाठी INDIA ची युती झाली आहे का?", असे भाजप आमदार नितेश राणे म्हणाले.

Live Update News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनोज जरांगेंची भेट घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे थोडाच वेळात औरंगाबाद विमानतळावर पोहचतील.

मराठा आंदोलक मनोज जरांगे १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे. इंथ आम्ही तुम्हाला देश, महाराष्ट्रातील ताज्या अपडेट इथं तुम्हाला वाचायला मिळतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com