मेल मर्ज : काही तासांचे काम करा अवघ्या काही मिनिटांमध्ये !  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mail Merge.

विद्यार्थ्यांचं प्रगतिपत्रक तयार करणं असेल, त्यांच्या दैनंदिन नोंदी नोंदवणं असेल, सहलीला जाताना अनेक पालकांची संमतिपत्र तयार करणं असेल... ही कामं "मॅन्युअली' करण्यासाठी अनेक तास आपल्याला खर्ची घालावे लागतात. पण या ठिकाणी आपण "मेल मर्ज' या एम एस वर्डमधील पर्यायाचा उपयोग केला तर खरोखर अनेक तासांचं काम अवघ्या काही मिनिटांतच आपण पूर्ण करू शकतो. त्यामुळं आपला अशा कामासाठी जाणारा वेळ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अतिरिक्त देता येऊ शकतो. ज्यामुळं मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभारच लागेल. 

मेल मर्ज : काही तासांचे काम करा अवघ्या काही मिनिटांमध्ये ! 

आज शिक्षणाचं तंत्रज्ञानासोबतचं नातं अतूट झालेलं आहे. आज अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये तंत्रज्ञान वापरावंच लागतं. तंत्रज्ञानाची कास धरून जी अनेक तासांची कामे आहेत ती अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण करता येऊ शकतात. विद्यार्थ्यांचं प्रगतिपत्रक तयार करणं असेल, त्यांच्या दैनंदिन नोंदी नोंदवणं असेल, सहलीला जाताना अनेक पालकांची संमतिपत्र तयार करणं असेल... ही कामं "मॅन्युअली' करण्यासाठी अनेक तास आपल्याला खर्ची घालावे लागतात. पण या ठिकाणी आपण "मेल मर्ज' या एम एस वर्डमधील पर्यायाचा उपयोग केला तर खरोखर अनेक तासांचं काम अवघ्या काही मिनिटांतच आपण पूर्ण करू शकतो. त्यामुळं आपला अशा कामासाठी जाणारा वेळ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अतिरिक्त देता येऊ शकतो. ज्यामुळं मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी हातभारच लागेल. 

यासाठी तुम्हाला काही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. जी जी माहिती तुम्हाला एखाद्या फॉरमॅटमध्ये बसवायची आहे त्याचा सर्व डाटा एका एक्‍सेल शीटमध्ये तयार करून ठेवावा लागतो व ज्या वर्ड फाईलमध्ये तुम्ही हे सर्व तयार करणार आहात तेथे मेलिंग्जमधील "सिलेक्‍ट रेसिपीयंट्‌स' या ऑप्शनला ओपन करून तुम्ही जी एक्‍सेल शीट या माहितीसाठी तयार केली होती, ती ऍड करावी लागते. त्यानंतर तुमच्या वर्ड फॉरमॅटमध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्‍सेल शीटमधला जो कॉलम घ्यायचा आहे तो एक-एक ऍड करायचा. त्यानंतर सर्व झाल्यावर फिनिश व मर्ज करावं, ज्यामुळं प्रत्येक त्याच्या पेजचं स्वतंत्र पेज त्या त्या माहितीनुसार तयार होतं. आहे की नाही गंमत! 

हीच माहिती आपण एक-एक करत कॉम्प्युटरवर करत गेलो असतो किंवा हातानं लिहीत गेलो असतो तर अनेक तास आपल्याला काम करावं लागतं. पण तंत्रज्ञानाचा योग्य प्रमाणात वापर करण्याची कला आपल्याला अवगत झाली तर हेच काम अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करू शकतो. तेही अगदी परफेक्‍ट! 

- राजकिरण चव्हाण
राज्य तंत्रस्नेही शिक्षक तथा जिल्हा समन्वयक, सर फाऊंडेशन, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

loading image
go to top