आता नो 'टिकटॉक्‌', ओन्ली 'चिंगारी'....

 major shake up to China’s digital dominance led to a ban on Chinese apps
major shake up to China’s digital dominance led to a ban on Chinese apps

भारत-चीन दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे सत्र देशभर सुरू झाले. अशातच सरकारने चीनच्या डिजिटल वर्चस्वाला मोठा हादरा देत तब्बल 59 चिनी ऍप्सवर बंदी घातली. सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या कारणास्तव सरकारने ही चिनी ऍप्स हटवून टाकलीत. यामध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या टिकटॉक्‌, शेअर-इट, हॅलो यासारख्या ऍपचा प्रामुख्याने समावेश आहे. यानंतर अर्थातच युजर्स भारतीय ऍप्सकडे युजर्स वळले आहेत, ही निश्‍चितच मोठी समाधानाची बाब ठरली आहे.

खरेतर भारतीय डिजिटल विश्‍वात चिनी ऍप्सनी मोठा दबदबा निर्माण करत बक्कळ कमाईही केली आहे. चिनी ऍप्सच्या तोडीची किंबहुना त्यापेक्षाही अधिक दर्जेदार आणि नावीन्यपूर्ण असतानाही भारतीय ऍप्सना चिनी ऍप्समुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. भारतीय तरुणाईला आकर्षित करत चिनी ऍप्सनी डिजिटल विश्‍व काबीज केले होते.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या अभियानाला देशभरात सुरवात झाल्यानंतर 'मित्रों' (Mitron) या भारतीय ऍपला युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली तर चिनी ऍप्सवर बंदी घातल्यानंतर टिकटॉक्‌सारखेच मजेदार असलेले अस्सल भारतीय असलेले "चिंगारी' ऍप झपाट्याने डाउनलोड केले गेले. बंदीनंतर केवळ 72 तासात तब्बल 5 लाखांहून अधिक युजर्सनी हे ऍप डाउनलोड केले. अजूनही हे ऍप मोठ्या प्रमाणात डाउनलोड केले जात आहेत.

खरेतर 2018 पासून 'चिंगारी' हे ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ; मात्र ठराविक भारतीय युजर्सच याचा वापर करत होते. 18 ते 24 वयोगटातील तरुणाई ही याची दिवानी आहे. आता मात्र सर्व वयोगटातील युजर्स 'चिंगारी'शी जोडले गेले आहेत.
बंदी घातलेल्या टिकटॉक्‌ आणि शेअर-इट, हॅलो, वुइ चॅटबरोबरच युसी ब्राऊजर, युसी न्यूज, एमआय कम्युनिटीसारखी चर्चेतील ऍप्सचाही समावेश आहे. तर अलिबाबा, बाईटडान्स, बायडू, टॅन्सेंट या ऍप्समध्ये चीनने मोठी गुंतवणूक केली असून ही ऍप 50 टक्के भारतीय वापरतात.
चिनी ऍप्सवर बंदीचा मोठा फटका हा चीनच्या डिजिटल बाजाराला बसला आहे. चीनवर भारताने केलेल्या 'डिजिटल स्ट्राईक'मुळे भारतीय तरुणाईला आता मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकार नवनवीन ऍप्स तयार करण्यासाठी तरुणाईला प्रोत्साहित करीत आहे. त्यामुळे भविष्यात तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरला मोठा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com