
केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची दोन हजार वर्षांची परंपरा असली तरी मल्याळी साहित्यात ख्रिस्ती मल्याळी साहित्य असा काही प्रकार अस्तित्वात नाही, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असलेल्या तामिळ भाषेत मध्ययुगीन काळापासून ख्रिस्ती धर्मगुरूंनी अभिजात दर्जाचे साहित्य निर्माण केले आहे. त्या तामिळ भाषेतसुद्धा स्वतंत्र ख्रिस्ती तामिळ साहित्य असे काही नसते. भारताच्या इतर कुठल्याही राज्यांत, प्रदेशांत असे धर्माच्या नावावर ओळखले जाणारे साहित्य नाही.