फक्त विचार नाही, एक चळवळ
भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो. काँग्रेस पक्षानेच लोकांना स्वातंत्र्यासाठी लढायला शिकवले आणि स्वातंत्र्याचे धडेही गिरवायला शिकवले. पक्षानेच देशाच्या विकासाच्या मार्गाला आकार दिला.
त्यांनी जनतेला विकसित देशाचे स्वप्न दाखवले. देशाची संस्कृती जतन करून मानवतेचा धर्म प्रस्थापित करण्याचे कामही काँग्रेसने केले. "काँग्रेस हा एक विचार नाही, ही एक चळवळ आहे." स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते अगदी आताही याच विचारधारेवर काँग्रेस पक्ष आधारलेला आहे आणि हीच विचारधारा नाना पटोले यांची त्यांच्या लहानपासूनच अंगी बाळगलेली दिसून येते.
नाना पटोले यांना स्वतःचा असा राजकीय वारसा नव्हता. पण समाजकार्य म्हटलं की नाना त्वरित मदतीला हजर आणि हे अगदी आताच नाही तर लहानपणापासून. त्यामुळे कोणाला अडचण आली की मदतीचा हात आपोआप पुढे येई.
वडिलांचा 'खाकी आणि खादी'ला विरोध होता. पण नाना एकूणच विद्रोही स्वभावामुळे घरातून विरोध असताना राजकारणात आले आणि समाजकार्याची त्यांची धडपड अजूनही सुरूच आहे. नाना मूळचे शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या दुःख त्यांनी जवळून अनुभवलं आणि बळीराजावर होणारा किंवा कोणावरही झालेला अन्याय नानांना पाहवत नाही, म्हणून प्रत्येक समस्येला धीटपणे तोंड देण्यास ते सदैव सज्ज असतात.
गावातील लोक म्हणतात "नाना म्हणजे संघर्ष". त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आणि सत्तेतील पदाची कधीच पर्वा केली नाहीत. सरकार जनतेकडून जास्त करवसुली करते पण त्याचा फायदा जनतेला होत नाही, मूठभर बड्या भांडवलदारांना होतो.
जो भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, ज्या देशात शेतकरी समृद्ध असावा, त्या बळीराजावर अन्याय होतो आहे, तो खुद्द पिळवटला जातोय. शेतकऱ्यांसाठी कितीतरी आश्वासनं दिली जातात पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत नानांना हे चित्र बदलायचं होतं.
संवैधानिक लोकशाही पद्धतीने शेतकऱ्यांचे हक्क मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असल्यामुळे त्यांनी त्वरित सत्तेतील पक्षाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात पुनःप्रवेश केला. यावरून नाना पटोलेंचा विद्रोही आणि आक्रमक पवित्रा दिसतो.
२०२२ साली भूमिहीन शेतमजूर आदिवासी समाजावर उपासमारीची पाळी येणार होती तेव्हा नाना पटोलेंनी सरकारविरोधी 'अतिक्रमण हटाव' मोर्चा काढला व त्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. हे सगळं होऊनही नाना पटोले शांत बसतील हे शक्यच नव्हते. त्यांनी त्वरित जेलमध्ये उपोषण सुरु केले आणि याचे फळ म्हणजे शेतमजुरांना न्याय मिळाला.
"काँग्रेस फक्त विचार नाही, एक चळवळ आहे." विलासराव देशमुख या त्यांच्या गुरूनेत्यांच्या या वक्तव्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. ओबीसीवरील अन्यायाविरोधात लाखांदूर ते भंडारा लॉंगमार्च, शेतकऱ्यांसाठी भंडारा ते नागपूर बैलबंडी मोर्चा, शेतकरी आंदोलन समर्थनार्थ काढण्यात आलेली पदयात्रा यामध्ये नाना पटोले यांचा लोकांशी असलेला जिव्हाळा आणि अन्यायाविरूद्ध प्रतिकार करण्याची वृत्ती दिसून येते.
काँग्रेस समाजातील सर्व स्तरांना समानतेच्या धाग्याने जोडण्याचं काम स्वातंत्र्योत्तर काळापासून करत आहे. हाच समानतेचा धागा पकडून नाना पटोले समाजकार्याचं काम मनापासून करत आहेत. "लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे मी यशाचे शिखर गाठू शकलो," असं ते सांगतात. "विविध जाती, बौद्ध बांधव, मच्छिमार बांधव, आदिवासी, ओबीसी यांचं दुःख मी जवळून पाहिलं आहे. मला त्याचा खूप त्रास होतो. ईश्वर मला याचे निराकरण करण्याची देवो आणि या लढ्यात माझं पद गेलं तरी चालेल," असं नाना नेहमी म्हणतात.
Facebook link Nana Patole
https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL
Instagram link Nana Patole
https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==
Twitter link Nana Patole
https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09
YouTube link Nana Patole
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

