न्यू नॉर्मल केल्याने पर्यटन

भारत सरकारने येणारे पर्यटक मुक्काम कसा वाढवतील, स्पर्धात्मक दर कसा कमी होईल
Tourism India
Tourism Indiasakal

भारतात पूर्वापार व्यापारासाठी दुसऱ्या खंडातून लोक येत असत. डच, फ्रेंच, पोर्तुगाल यांचा भारताबरोबर असणारा व्यापार उद्योग हा जगप्रसिद्ध आहे. मसाले, रेशीम, सोने यासाठी तसेच तक्षशिलेत शिकण्यासाठी येणारे, आपल्या योगविद्या, आयुर्विद्येसाठी येणाऱ्या पर्यटक व व्यापाराचे उल्लेख इतिहासात आहेत. नव्या धोरणानुसार पर्यटन क्षेत्र हे विकासाचा मार्ग असून नव्या रोजगार संधी त्याद्वारे प्राप्त होणार आहेत. भारताने ही विकासाची पंचसूत्री मांडली आहे.

हरित पर्यटन

डिजिटल पर्यटन

आतिथ्य व कौशल्य

व्यावसायिक संस्था उभारणी

छोटे व लघुउद्योग

याला साहाय्य करण्यासाठी भारत सरकारने येणारे पर्यटक मुक्काम कसा वाढवतील, स्पर्धात्मक दर कसा कमी होईल त्याला सरकार व खासगी संस्था संयुक्त काम करतील. हे नवे धोरण पुढील दहा वर्षाचा विचार मांडते. यात केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था या साऱ्यांचा विचार करण्यात आला आहे.

दृष्टी : भारताला सर्वात उत्कृष्ट पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन केंद्र बनवणे व त्यांना जागतिक दर्जाचा पर्यटन अनुभव देणे यासाठी सस्टेनेबल व सजग अशी पर्यटन स्थळ विकसित करणे.

ध्येय : हे घडवून आणण्यासाठी योग्य नीती, आवश्यक ती धोरणे, अंमलबजावणीचे टप्पे ठरवून केंद्र, राज्य, स्थानिक संस्था यांबरोबर व्यावसायिक व लाभार्थी यांच्यासोबत सक्षमीकरण करणे.

उद्दिष्टे : भारत जगातील पहिला पाच पर्यटन स्थळांमध्ये निवडला जाईल व २०३० पर्यंत विदेशी पर्यटकांची संख्या व उत्पन्न वाढेल.

अर्थात हे काही आपोआप घडणार नाही. अंमलबजावणीचे टप्पे वेगाने पुढे जात आहेत. अरुणाचल प्रदेश सरकार गाइड होण्यासाठी प्रशिक्षण देत आहे, इंग्रजी व अन्य भाषेचा सराव तिथले तरुण करत आहेत. हे बदल बोलके आहेत.

ईशान्येकडील पर्यटन एकेकाळी साहसी होते. बदलणारे हवामान, रद्द होणारे गाड्या, कोणतीही विमानसेवा नाही, तिथला प्रादेशिक वाद व सीमेवरील अस्थिरता याचा प्रादुर्भाव अनेक वर्ष होता. आज मात्र या प्रदेशात असणारी व्यावसायिकता व वाढलेला पर्यटन पूरक विकास हा लक्षणीय आहे. सर्वसमावेशक स्थिर व जबाबदार पर्यटन वरील आसाम किंवा ईशान्येकडील उदाहरणे हे त्याचेच फळ आहे. केरळात हे वातावरण आधीपासून तयार झाले. पर्यटनासाठी नवीन डिजिटल प्रणाली व संशोधन याचा सुयोग्य वापर -

भारतातील रेल्वे, विमान, रोड यासारख्या क्षेत्रात इतक्या सहज सुलभतेने डिजिटल ॲप्स समावेश झाला आहे की सर्वसामान्य नागरिक ही त्याचा लाभ घेत आहेत. हॉटेल बुकिंग, पेमेंट गेटवे कागदपत्रे पाठवणे यासाठी सर्रास वापर होत आहे. दहा वर्षांपूर्वी पर्यटनाचे नियोजन किती अवघड होते. तेव्हा पूर्णपणे परावलंबित्व व केवळ खासगी पर्यटक संस्थांवर होते. आता दोन्हींसाठी ‘विन-विन’ परिस्थिती हे डिजिटल इनोव्हेशन करत आहे.

सरकारी धोरणाशी सुसंगत असा विकास पर्यटन नीती अमलात आल्यावर ती एकांगी एकाच प्रदेशाचाच विकास यापेक्षा देशाचा समतोल विकास हे सूत्र आहे. यासाठी सुरक्षा, सुरक्षित प्रतिबंधित क्षेत्र, नॅशनल पार्क, हेरिटेज सेंटर, वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

सध्या भारतातील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी विविध ३५५ प्रकल्प संधी उपलब्ध आहेत त्याचे मूल्य १२४८४.७० कोटी रुपये आहे. योग्य ती कौशल्य शिकवणे, अधिक उत्पादित सेवा तयार करणे गरजेचे आहे. पुढील लेखात म्हणूनच पाहूया काही नव्याने विकसित झालेली पर्यटन क्षेत्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com