

Blog
esakal
विजय नाईक
मध्यरात्रीचा एक वाजत आला होता. न्यू ऑर्लियन्सच्या फ्रेन्च क्वार्टरमधील निमुळत्या बर्बॉन रस्त्यावर जॅझ संगीताचे स्वर टीपेस पोहोचले होते. त्याच्या सुरांवर तरूण मुलं मुली, वयस्क, प्रेमी युगुले ठेका धरून नाचू लागली.
सिगरेट्स अन् सिगार्सचा धूर आणि उग्र वास पसरलेला होता. पादपथावरून चालणं मुश्कील इतकी गर्दी. जॅझचा ड्रम, बास, गिटार, सॅक्सोफोन, ट्रम्पेट,, ट्राँबोन, क्लॅरिनेट ही वाद्ये वाजविणारे सारे कृष्णवर्णीय अमेरिकन गळ्याचा नळा करून त्यात हवा फुंकत होते. हे संगीत तसे कर्कशच. जॅझ संगीताची ती खासियत. त्याच रस्त्यावर दुतर्फा एकमेकाला लागून असलेल्या शेकडो रेस्टॉरन्ट्समधून चालू असलेल्या जॅझ शो मध्ये वर उल्लेखिलेल्या वाद्यात भर होती, ती पियानोच्या सुरांची.