सेंद्रिय शेती का आहे फायदेशीर जाणून घ्या

रंगराव हिर्डेकर
Friday, 11 September 2020

‘एक घात आणि बारा गाड्या खत’ अशी म्हण आजही गावगाड्यात प्रचलित आहे. त्या प्रमाणे  सेंद्रिय शेतीतून निघणारे उत्पन्न जरी कमी येत असले तरी ते सकस असते.

‘एक घात आणि बारा गाड्या खत’ अशी म्हण आजही गावगाड्यात प्रचलित आहे. पाऊस ठरल्याप्रमाणे ऋतुमानानुसार पडत होता. घराच्या सोप्यात दावणीला दहा-बारा गुरंढोरं बांधलेली असायची. त्यामुळे गावठी खत मुबलक. मग मिरगअखेरीला मशागतीवेळी गावठी खताचा डोस रानात पडायचा. वर्षाकाठी कुटुंबाला पुरेल एवढं सकस धान्य घरच्या घरी पिकत होतं.

आज मात्र परिस्थिती पूर्ण आधुनिक झाली आहे. एका घराची चार घरं झाली. घराच्या, शेतीच्या वाटण्या झाल्या आणि गुंठ्याला पोत्याचा उतारा कमी पडू लागला. परिणामी शेतकरी संकरित बियाणांकडे वळला. पाठोपाठ रासायनिक खतांची मात्रा वाढली आणि चवीची जागा चोथ्यानं घेतली. आता हे कळून आल्याने पुन्हा लोक सेंद्रिय उत्पादनाकडे वळू लागले आहेत. सेंद्रिय शेतीतून निघणारे उत्पन्न जरी कमी येत असले तरी ते सकस असते. सेंद्रिय शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकतो. किमान एका देशी गायीचे पालन केल्यास जीवामृत, घनजीवामृत, जैविक खते आदी सहज उपलब्ध होऊ शकते. रासायनिक खते, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करावा लागेल.

सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करावी लागेल. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता एक एकराला किमान चार ते पाच हजारांचे रासायनिक खत लागते. तुलनेने शेणखताचे अनेक फायदे आहेत. मुबलक गवत, पालापाचोळ्याचा उपयोग करून सेंद्रिय खते प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर करणे शक्‍य आहे. भात आणि भुईमूग पिकांची सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास सेंद्रिय उत्पादनास वाढीला पोषक वातावरण तयार होईल. वाढत्या लोकसंख्येची दोन वेळची भूक भागविण्यासाठी कमी होत चाललेल्या मर्यादित जमीन क्षेत्रातून मुबलक प्रमाणात अन्नधान्य पिकविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशातच बदलती नैसर्गिक स्थिती आणि रासायनिक घटकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा प्रभावी प्रसार आणि अवलंब करणे मृदा आणि मानव यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी एक गोष्ट हेरली पाहिजे, की आताच्या काळात लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य, विविध फळे, पालेभाज्या यांना मागणी वाढत आहे. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असले, तरी रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्यांच्या तुलनेत सेंद्रिय शेतमालास मिळणारा मोबदला चांगला आहे. आता तर सरकारही सेंद्रिय शेतीसाठी अनुदान स्वरूपात मदत देत आहे. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ऊस उत्पादकांसाठी योजना आणली आहे. साखर कारखान्यांमार्फत ही योजना राबविण्याचा मानस आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीने ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आता सेंद्रिय ऊस शेतीकडे वळू लागले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात कागलच्या शाहू कारखान्याने सेंद्रिय ऊस शेती पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. २५ टक्के अनुदानावर मृदा, गांडूळ खत, मिश्र पेंड, सेंद्रिय खते पुरवण्यात येणार आहेत. या सवलतींचा वापर करून अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय ऊस शेतीकडे वळतील, अशी आशा करू या!सेंद्रिय शेतीचा मार्ग धरा !

‘एक घात आणि बारा गाड्या खत’ अशी म्हण आजही गावगाड्यात प्रचलित आहे. पाऊस ठरल्याप्रमाणे ऋतुमानानुसार पडत होता. घराच्या सोप्यात दावणीला दहा-बारा गुरंढोरं बांधलेली असायची. त्यामुळे गावठी खत मुबलक. मग मिरगअखेरीला मशागतीवेळी गावठी खताचा डोस रानात पडायचा. वर्षाकाठी कुटुंबाला पुरेल एवढं सकस धान्य घरच्या घरी पिकत होतं. आज मात्र परिस्थिती पूर्ण आधुनिक झाली आहे. एका घराची चार घरं झाली. घराच्या, शेतीच्या वाटण्या झाल्या आणि गुंठ्याला पोत्याचा उतारा कमी पडू लागला. परिणामी शेतकरी संकरित बियाणांकडे वळला. पाठोपाठ रासायनिक खतांची मात्रा वाढली आणि चवीची जागा चोथ्यानं घेतली. आता हे कळून आल्याने पुन्हा लोक सेंद्रिय उत्पादनाकडे वळू लागले आहेत.

सेंद्रिय शेतीतून निघणारे उत्पन्न जरी कमी येत असले तरी ते सकस असते. सेंद्रिय शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खर्च कमी होऊ शकतो. किमान एका देशी गायीचे पालन केल्यास जीवामृत, घनजीवामृत, जैविक खते आदी सहज उपलब्ध होऊ शकते. रासायनिक खते, कीटकनाशकांचा नियंत्रित वापर करावा लागेल. सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करावी लागेल. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता एक एकराला किमान चार ते पाच हजारांचे रासायनिक खत लागते. तुलनेने शेणखताचे अनेक फायदे आहेत. मुबलक गवत, पालापाचोळ्याचा उपयोग करून सेंद्रिय खते प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर करणे शक्‍य आहे.

भात आणि भुईमूग पिकांची सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास सेंद्रिय उत्पादनास वाढीला पोषक वातावरण तयार होईल. वाढत्या लोकसंख्येची दोन वेळची भूक भागविण्यासाठी कमी होत चाललेल्या मर्यादित जमीन क्षेत्रातून मुबलक प्रमाणात अन्नधान्य पिकविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशातच बदलती नैसर्गिक स्थिती आणि रासायनिक घटकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा प्रभावी प्रसार आणि अवलंब करणे मृदा आणि मानव यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी एक गोष्ट हेरली पाहिजे, की आताच्या काळात लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य, विविध फळे, पालेभाज्या यांना मागणी वाढत आहे. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असले, तरी रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्यांच्या तुलनेत सेंद्रिय शेतमालास मिळणारा मोबदला चांगला आहे. आता तर सरकारही सेंद्रिय शेतीसाठी अनुदान स्वरूपात मदत देत आहे. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ऊस उत्पादकांसाठी योजना आणली आहे. साखर कारखान्यांमार्फत ही योजना राबविण्याचा मानस आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीने ऊस उत्पादन घेणारे शेतकरी आता सेंद्रिय ऊस शेतीकडे वळू लागले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात कागलच्या शाहू कारखान्याने सेंद्रिय ऊस शेती पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. २५ टक्के अनुदानावर मृदा, गांडूळ खत, मिश्र पेंड, सेंद्रिय खते पुरवण्यात येणार आहेत. या सवलतींचा वापर करून अधिकाधिक शेतकरी सेंद्रिय ऊस शेतीकडे वळतील, अशी आशा करू या!

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स