तुमच्या नात्यातही पडलाय का Communication Gap?

तुमच्या नात्यातही पडलाय का Communication Gap?

बागेत बसलेल्या त्या दोघांना मी अनेकवेळापासून बघत होते. त्याचं अनेक विषयांवर बोलणं सुरू होतं. त्यानंतर अचानक ती उठली आणि निघून गेली. त्यानं तिला अडवलं ही नाही. मी त्यांच्या इतकीही जवळ नव्हते की, त्यांचे बोलणे मला ऐकू येईल. जे काही झाले असेल ते असेल, पण इतका वेळ हसत आणि मजेत राहणारे ते दोघे आता मात्र एकमेकांपासून दूर गेले होते. शरीराने तर होतेच, पण मनातही अनेक थैमान उठली असतील.

तसं पहायला गेलं तर खूप किरकोळ गोष्ट होती. पण, तीचं उठून जाणं आणि त्यानं तिला न अडवणं खूप काही बोलून गेलं. एखाद्या गोष्टीवर राग असेल तर तो जिथल्या तिथे व्यक्त करायला हवा. एका बागेतील बेंचवर बसलेल्या त्या दोघांमधील वाद तिथेच मिटायला हवा. पण, तसे न होता तो वाद बागेच्या बाहेर तर जातोच तसेच दोघांच्या हृदयातून डोक्यातही जातो.

त्यानं तिला अडवलं असतं आणि बोलून तिचा राग शांत केला असता तर खरंच खूप छान झालं असतं. म्हणजे येताना एकत्र आले होते जातानाही हसत गेले असते. पण, नाही इगो आडवे येतात ना? चुका झाल्या की त्यावरून वाद होतात आणि वाद मिटवायला आधी सॉरी कोण बोलणार यावर इगो आडवे येतात आणि मग अगदी किरकोळ गोष्टीही ताणल्या जातात. पण, वाद ही अशी गोष्ट आहे जी ताणल्यावर मोठी होती आणि पटकन एखादं रबर तुटावं तसं नातं तोडून जातं.

नात्यात इगो ही गोष्ट बाजूला ठेऊन रहावं लागतं, तसं राहावं प्रत्येकाने. आयुष्य अगदी थोडसं आहे. त्यातही जर राग आणि वाद यांची गर्दी झाली तर मग जगणं आणि जगण्यातील हसणं लोक विसरून जातील. नातं मैत्रीच असो किंवा प्रेमाच. हा, म्हणजे प्रेमातच वाद होतात असं नाही तर अनेक साध्या गोष्टी ओढून ताणून धरल्याने मैत्रीही संपुष्टात येते. एखाद्याशी वाद झाला आणि समोरील व्यक्तीच काहीतरी बिनसलं आहे हे ओळखणं खूप सोपं आहे. म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाद झालेले किंवा रडके फोटो ज्याने शेअर केले त्याच आज नक्की काहीतरी बिनसलं आहे हे ओळखत. हे असे फोटो ज्या व्यक्तीसाठी असतात तिथं पर्यंत ते पोहोचतात आणि मग वाद मिटायच्या ऐवजी तो आणखीनच लांबतो.

तुमचेही असे अनेक वाद होत असतील ना? त्यावेळी योग्य मार्ग दाखवणारं कोणीतरी हवं असतं. पण, चुकीच्या मित्रांच्या बोलण्याने वाद संपण्या ऐवजी ते आणखीनच वाढतात. यामुळे तुमचे प्रश्न आणि तुमचे वाद तुम्ही स्वतःच सोडवा. ते सोडवायला दुसरं कोणीही नाही येत, तर ते तुम्हालाच सोडवावे लागतात. बॉलिवूडमधील एक गाणं आहे. त्याचा अर्थ असा होतो की, आयुष्य चारच दिवसांच आहे. ते चांगलं जगून घ्या. या चार दिवसाच्या आयुष्यात वादच आठवणीत ठेवायचे की काही आनंदी क्षण गोळा करायचे हे तुमच्या हातात आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com