जगात निर्मळ प्रेम आहे, फक्त ते जाणता आलं पाहिजे!

जगात निर्मळ प्रेम आहे, फक्त ते जाणता आलं पाहिजे!

हॅलो, कुठं आहेस? काय करतेस? अलीकडून आवाज येऊ लागतो. जरा हळू बोल, नवरा बाजूलाच आहे! पलीकडून तसाच प्रतिसाद... चॅटिंग, कॉल, भेटणं असं काहीच होत नाहीय हल्ली आपल्यात, रागातच फोन कट होतो. आपल्याला सर्रास आजूबाजूला या घटना ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. एक trill म्हणून जास्तच मजा वाटते काही जणांना. ( ऐकायला, gossip करायला आणि जमलंच तर करायला देखील).

विवाहबाह्य संबंध एका विषारी झुडपासारखे वाढत राहताहेत आणि आपण मुकाट्यानं त्याचा जराही निषेध न करता "त्याच" विषारी झुडपाकडे गोंडस झुडप म्हणून बघत राहतो. तसल्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याऐवजी त्यांच्याकडे कुतूहल म्हणून पाहतो, ही खरी शोकांतिका! अनेक इवली-इवली घर होरपळून जातात विनाकारण आणि समाज मात्र हसत राहतो.. कलियुग, कलियुग आहे बाई.. व्यभिचाराला इथे मोल आहे, असं काहीशी विद्रुप वाक्य तोंडावर फेकली जातात. 

जेव्हा आपण नैतिक काही सांगतो, तेव्हा व्यभिचाराला मोल असेल तर मग आपण उत्क्रांत होत असताना का सुसंस्कृत झालो? का अजूनही फक्त एकावरच प्रेम होत? का loyalty महत्वाची वाटते? का निरागस असं काही दिसलं तर आपण गुंततो? आणि माणूस ही जात इतर प्राण्यांपेक्षा वेगळी? याची आपण उत्तरं कधीच नाही शोधत, कारण "आपल्यातील "LUST"न  या प्रश्नांना कधीच गिळून टाकलेलं असतं. हॅलो,  कुठं आहात ओ?  किती कॉल केले? Busy आहात काय? अलीकडून सौम्य आवाज कानी पडतो. मी घरीच आहे, असं काहीस उत्तर समोरुन येतं. बरं ऐका माझं. फ्रिजमध्ये जेवन करून ठेवलंय, ते गरम करून घ्या आणि हो, कॉफी थर्मासमध्ये आहे. मला ऑफिसमधून यायला थोडा उशीर होईल, मिटिंग आहे ना म्हणून.. बाकी आल्यावर मी सगळं करेन. मी येताना चिऊला घेऊन येते शाळेतून.. काळजी घ्या.. अशी काळजी घेऊन फोन कट होतो. समोरुन लगेच रागात.. मी लहान आहे का, किती ती बडबड हे नेहमीच ऐकून कंटाळा येतोय, असं काहींच्या बाबतीत घडतं ही, मात्र काहींना बायकोची काळजी कधीच कळली नाही, असो..

Possessive चा तिटकारा वाटतो, Trilling काही नसतं ना त्यात. एकतर बायको, त्यात बायको काय काळजी करतेच की, तिची ती जबाबदारीच आहे.. त्यात काय नवीन? वैगेरे वैगेरे. ती कधीच गोड नाही बोलत. बोलते स्पष्ट आणि सत्य. मग तेच झोंबत बऱ्याचवेळा! त्यापाठची माया नाही दिसत. दिसतो तिच्यातला typical पणा... असं प्रेमाचं झुडप देखील फुलत राहत समाजात. बरेचजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात." This is so called boring type love " No thrilling experience is here. असं म्हणून संपूर्ण दुर्लक्षित केलं जातं किंवा गृहीत धरलं जात. जगात निर्मळ प्रेम आहे, फक्त नजरेतून ते जाणता आलं पाहिजे. समोरच्या जोडीदाराच्या व्यथा, सुख ओळखता आलं पाहिजे, असं जर झालं तर विवाहबाह्य संबंधाची कधी अभिलाषा वाटणार नाही. म्हणून आपल्या माणसावर भरपूर प्रेम करा, तिचा मनापासून स्वीकार करा, सन्मान करा!

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com