जनशक्तीवर अढळ विश्वास

समाजाच्या तळागाळातील वास्तव जाणून घेण्यासाठी जनसंवाद नियमित साधणे
narendra modi
narendra modi sakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारभाराच्या जनकल्याणकारी आणि लोकसहभागाला प्राधान्य देण्याच्या वैशिष्ट्याची महती सांगणारे दोन लेख.

-जगत प्रकाश नड्डा

“ज नशक्तीमध्ये आपली ताकद आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकामध्ये आपली ताकद सामावलेली आहे”

-पंतप्रधान मोदी

जनभागीदारी अर्थात लोकसहभाग ही संकल्पना खऱ्या अर्थाने मोदींनी अंगीकारली. जनशक्तीवर विश्वास दाखवत, जनतेला योगदान देण्यास ते प्रवृत्त करीत आहेत. सरकारच्या काही चुका होत असल्यास त्या तपासण्यास; तसेच अंमलबजावणीदरम्यान उद्भवणारे प्रश्न सरकारच्या लक्षात आणून देण्यासही त्यांनी प्रवृत्त केले आहे. एऽढेच नव्हे तर प्रशासनाला मदत करण्यासही इतरांना प्रेरित केले आहे.

समाजाच्या तळागाळातील वास्तव जाणून घेण्यासाठी जनसंवाद नियमित साधणे, ही समावेशक प्रशासनाची मूलभूत गरज आहे. अशा संवादानंतर समस्यांचे विश्लेषण करून त्यांच्या निराकरणासाठी सुचविलेल्या उपाययोजनांचा समावेश असलेले दस्तावेज तयार करणे, ही या प्रक्रियेची पुढची पायरी. धोरणाच्या अंमलबजावणीनंतर लोकांचा अभिप्राय आणि त्यानंतर लाभार्थींचा अभिप्राय याआधारे धोरणाची पूर्णत्वाने अंमलबजावणी केली जाते. मोदी सरकारने विविध माध्यमांद्वारे लोकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्याशी संवाद सातत्याने केला. पीक विम्यासाठी त्यांनी दोन योजना एकत्र केल्या. २०१९-२०२०मध्ये या योजनेचा नव्याने शुभारंभ करण्यात आला. ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांकडून अभिप्राय घेतले. त्यानंतर नव्याने सादर केलेली सुधारित योजना अद्वितीय आहे. विविध समस्या विचारात घेऊन योजनेत सुधारणा करण्यात आल्या असून परिवर्तनासाठी केल्या जाणाऱ्या संवादसामर्थ्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

स्वीकृत काम पूर्ण करेपर्यंत जनतेचा उत्साह टिकवून धरण्यात मोदी यशस्वी होतात. आखलेल्या धोरणांच्या यशासाठी लोकांनी अनेक वेळा त्याच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आकडेवारीच्या आधारे या योजनांचा एक आयाम लक्षात येतो. पण मोदींच्या विचारांतून येणाऱ्या योजनांचे सौंदर्य त्यांच्या बहुआयामी असण्यात आहे. लोकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते विचार करतात, हे त्यांच्या शब्दांमधून सतत जाणवत राहते.

एक नेता म्हणून, धोरणांमध्ये सर्व नागरिकांना सामावून घेण्याचा आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत लाभ पोहोचावेत, यासाठी आग्रही असण्याचा मोदी यांचा संकल्प त्यांच्या समग्र दृष्टिकोनाशी आणि सुप्रशासनासाठीच्या आग्रहाशी सुसंगत आहे. ‘उघड्यावरील शौचमुक्ती’ हे त्याचे एक उदाहरण. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानपदावरून केलेल्या पहिल्या भाषणात त्यांनी सर्व नागरिकांना त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’त सहभागाचे आवाहन केले. ही एक यशस्वी लोकचळवळ होती आणि या मोहिमेंतर्गत देशातील एक लाखापेक्षा जास्त गावे हागणदारीमुक्त (ओडीएफ प्लस) झाली आहेत, तर अवघ्या ६० महिन्यांत देशात ११ कोटीपेक्षा जास्त शौचालये बांधण्यात आली आहेत. प्रमाणाबाहेर यशस्वी झालेल्या या लोकचळवळीने अवघ्या जगाला थक्क केले आहे. प्रथमदर्शनी ही एक निव्वळ स्वच्छता मोहीम वाटत असली तरी या मोहिमेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान जपला गेला आहे, त्या अधिक सुरक्षित झाल्या, असंख्य मुलांचे प्राण वाचले आणि अनेक मुलींना शाळा सोडण्यापासून रोखले गेले आहे.

‘जल जीवन मोहिमें’तर्गत ग्रामीण भागांत १० कोटीपेक्षा जास्त नळजोडण्या प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेमुळे महिलांना पाणी आणण्यासाठी वणवण करण्याची गरज राहिलेली नाही. आजारांना आळा बसला आहे.लसीकरणाचा विक्रम

अवघ्या १८ महिन्यांच्या अवधीत २०० कोटींपेक्षा जास्त कोविडप्रतिबंधक लसीकरणाचा विक्रम देशाने केला. हे सहजसाध्य नव्हते.पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सामूहिक प्रयत्नांचे ते फलित. दुर्घट ध्येय साध्य करण्याच्या त्यांच्या दृढनिश्चयामुळे आणि लोकांवर असलेल्या अमाप विश्वासामुळे अशक्य ते शक्य झाले. साथरोगाच्या काळात मोदींनी लोकांना संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि या संकटाशी दोन हात करणाऱ्या, आघाडीवर लढणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कौतुक करण्यासाठी दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या सर्वच कल्पक लोकचळवळींना देशभरातून जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद लाभला.आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे, ज्यांना परवडत होते, त्यांनी एलपीजी गॅस आणि रेल्वे तिकीटांसाठीच्या अनुदानाचा त्याग केला. लोकसहभागातून साधलेल्या बदलांची ही उदाहरणे आहेत.

‘मन की बात’, हाही असाच एक यशस्वी कार्यक्रम. या लोकसहभागाधारित कार्यक्रमाला ‘सामाजिक क्रांती’ अशी व्यापक ओळख लाभली आहे. प्रत्येक व्यक्तीत परिवर्तन घडविण्याची क्षमता आहे, यावर मोदींचा अढळ विश्वास आहे आणि तो ‘मन की बात’च्या प्रत्येक भागात ते अधोरेखित करतात. स्वदेशी व्यापाराला चालना देण्यासाठी आणि स्थानिक व्यवसायांची भरभराट होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’, ही लोकचळवळ सुरू करण्यात आणि उद्योजकतेला चालना देण्यात मोदींना यश आले. या चळवळीने असंख्य लहान व्यवसायांना बळ दिले. दुर्गम भागातील स्टार्टअप्स टिकवून ठेवण्यात मदत केली आहे आणि पारंपारिक हस्तकला पुनरुज्जीवित करण्यात हातभार लावला आहे. खेळण्यांच्या उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भरता मोहिमेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन देण्याचे केलेले आवाहन, ही निश्चितच अनोखी घटना होती.

‘देशातील ५ ते ७ वर्षांच्या लहान मुलांना मला सलाम करायचा आहे. देशाचे आत्मभान जागृत झाले आहे. मी असंख्य कुटुंबांकडून ऐकले आहे की ५-७ वर्षांची मुले त्यांच्या पालकांना सांगतात, की त्यांना परदेशी खेळण्यांसोबत खेळायचे नाही. अवघ्या पाच वर्षांचे मूल जेव्हा असा संकल्प करते, तेव्हा त्याच्या वागण्यातून आत्मनिर्भर भारताची प्रखर भावना प्रतिबिंबित होत असते.

मोदी यांनी २०२०पासून देशातील स्टार्टअप्सना, भारताला खेळण्यांचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे आणि देशात खेळणी समूह उभारण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. २०२२पर्यंत तसे समूह विकसित झाले आहेत. भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित खेळणी विकसित करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देण्यासाठी ''टॉयकॅथॉन'' सारख्या उपक्रमांना गती मिळाली आहे. सर्व खेळणी उत्पादकांना खेळण्यांसाठी BIS (ब्यूरो ऑफ इंडियन सर्टिफिकेशन) मानकांनुसार प्रमाणन प्राप्त करणे अनिवार्य केले असून, त्या माध्यमातून या क्षेत्रातील अनेक चिनी स्पर्धकांना हद्दपार करण्यात आले आहे.

मोदी यांनी जींनी नागरिकांवर सातत्याने ठाम विश्वास दाखवला आहे आणि त्याचे अविश्वसनीय सकारात्मक परिणाम वारंवार दिसून आले आहेत. ज्या लोकशाहीत शासकीय धोरणांचे लाभ समाजातील तळागाळापर्यंत पोहोचतात, ती खऱ्या अर्थाने यशस्वी मानली जाते. मोदी यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर सर्वांचा सहभाग सर्वांना समृद्धीच्या मार्गावर घेऊन जातो. हीच यशाची गुरूकिल्ली आहे.

एखाद्या सरकारला पाच वर्षांचे कंत्राट देणे म्हणजे लोकशाही नव्हे, तर लोकशाही म्हणजे जनभागीदारी आहे.

- नरेंद्र मोदी , पंतप्रधान (लेखक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com