
- राधिका वळसे पाटील
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये २६ वर्षीय युवतीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यातील समाजमन अस्वस्थ झाले. दूरचित्रवाणी वाहिन्या, सोशल मीडियावर त्याचे विविधाअंगी पडसाद उमटत होते. त्यातून जनमानसात संताप निर्माण झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील एसटी स्थानकात अशी घटना कशी घडू शकते? सुरक्षा रक्षक, पोलिस, एसटीचे अधिकारी काय करीत होते? असे विविध प्रश्न यातून निर्माण झाले. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘ती’ सुरक्षित का नाही? याचा जाब कोण, कोणाला, कसा आणि का विचारणार?