
प्रिय गंप्या,
काय बाबा, आता बारावीची परीक्षा झाली. पेपर संपल्या संपल्या तू म्हणे ‘छावा’ पाहायला गेला. तुझ्या इन्स्टावर फोटो पाहिले मी. मस्तच! मज्जा आहे ब्बा. फेसबुकवर ती औरंगजेबाच्या कबरीबाबतची तू शेअर केलेली पोस्टही बघितली बरं मी. आता काय, मिश्यांसोबत तुला मतंही फुटताहेत. माणसाला आपलं स्वतःचं मत असावंच; कारण ते आपल्याच धडावर आपलंच डोकं असल्याचं लक्षण आहे.