‘लिव्हिंग प्लॅनेट’चा सांगावा

Report The Living Planet 2020 expean by sachin charati
Report The Living Planet 2020 expean by sachin charati

सर्वसाधारणपणे बहुतांश घरांतील गृहिणींचं विरजणाचं एक आगळं गणित असतं. ते सहजासहजी बिघडत नाही. कारण एकदा विरजण मोडलं, तर बाजारातून, शेजाऱ्यांकडून ते आणावे लागते किंवा थोडी अधिकची खटपट करून ते पुन्हा तयार करावे लागते. त्यामुळं घरातील दही-ताकाचं भांडं शक्‍यतो कोरडंठाक ठेवलं जात नाही. घरातल्या, समाजातल्या चांगल्या गोष्टींचं संवर्धन करून त्या पुढे नेण्याचं कसबच जणू महिलांकडं असतं. आपल्या हातातील ‘बॅटन’ आपसूक पुढच्या पिढीकडं सोपविण्याचं हे चक्र त्यांच्याकडून अविरत सुरू असतं.


तसं तर मानवी जीव म्हणून पृथ्वीवर जन्म झाल्यावर निसर्ग आपल्याला जगण्यासाठी मुक्तहस्ते संसाधनं पुरवतो. त्याचा आपण उपभोग घेतो; पण तो पर्याप्तपणे घेतो का..? नैसर्गिक संसाधनांवर आपल्याबरोबरच पृथ्वीवरील अन्य जीवांचाही अधिकार आहे, हे आपण मान्य करतो का? हे तपासून पाहण्याची ही वेळ आहे. कारण वैयक्तिक जीवनात या प्रश्‍नांची उत्तरे आपण कदाचित सकारात्मक देऊ; मात्र मानव म्हणून आपली सामुदायिक कृती अत्यंत नकारात्मक असल्याचे पुढे येत आहे. 
लंडनच्या झूऑलॉजिकल सोसायटीच्या मदतीने वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड (डब्लूडब्लूएफ) या संघटनेने नुकताच ‘द लिव्हिंग प्लॅनेट २०२०’ हा अहवाल सादर केला. या अहवालात ठसठशीतपणे जाणवणारा मुद्दा म्हणजे १९७० पासून जानेवारी २०२० पर्यंत पृथ्वीवरील सस्तन प्राणी, पक्षी, मासे, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत ६८ टक्के इतकी घट झाली आहे. याबरोबरच गोड्या पाण्याच्या परिसंस्थेतील सजीवांच्या संख्येत ८४ टक्के घट झाली आहे. केवळ पन्नास वर्षांत पृथ्वीवरील जैवविविधतेची झालेली ही हानी धक्कादायकच म्हणावी लागेल.


तशी जैवविविधतेबाबतीतली आपली जाणीव ‘सजग’ आहे. या सजगतेतूनच ऑक्‍टोबर २०१० मध्ये जपानमध्ये झालेल्या परिषदेत संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून जगभरातील राष्ट्रीय सरकारांनी जैवविविधता राखण्यासाठी २० कलमी कार्यक्रम स्वीकारला. ‘ऐची बायोडायव्हर्सिटी टार्गेटस्‌’ म्हणून याची ओळख आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून २०११ ते जानेवारी २०२० पर्यंत जैवविविधता संवर्धनासाठी जगभरातील राष्ट्रांनी प्रयत्न करणार असल्याचे मान्य केले होते. या २० कलमी कार्यक्रमाचे काय झाले..? याचा अभ्यासही ‘द लिव्हिंग प्लॅनेट’ या अहवालात केला आहे. त्या अभ्यासानुसार, हा २० कलमी कार्यक्रम राबविण्यात जग आणि पर्यायाने माणूस नापास झाला आहे. या २० कलमी कार्यक्रमात पर्यावरण राखण्यासाठी एकूण २० उद्दिष्टे घेतली होती. त्यातील एकही पूर्ण झालेले नाही. केवळ सहा उद्दिष्टे पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत गाठता आली आहेत. यातून मानवाच्या सजगतेला कृतीची जोड नाही, हे स्पष्ट होत आहे. 


एका निर्णायक टप्प्यावर मानव आला असताना, अन्नाची निर्मिती व त्याचे सेवन करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणून आणि अधिक महत्त्वाकांक्षीपणे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करून निसर्गाच्या नुकसानीस स्थिर करणे व त्याला प्रतिकार करणे शक्‍य आहे, असे हा अहवाल सुचवितो. आता निसर्गाने जैवविविधतेच्या रूपानं आपल्या हाती दिलेले हे ‘बॅटन’ पुढच्या पिढीकडे सुस्थितीत सोपवणं आणि पृथ्वीवरील संसाधनाचा वाटा ज्या-त्या जीवाच्या पदरी आहे तसा ठेवणं हे माणूसपणाचं ठरेल. यासाठी आपली जीवनशैली अधिकाधिक पृथ्वीस्नेही करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण हे पृथ्वीवरचं जैवसंसाधनरूपी विरजण संपवलं, तर मागून आणायला आपल्याकडे शेजारही नाही आणि बाजारपेठही.

कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरकोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com