

Sagrada Família – Barcelona’s Timeless Masterpiece and Symbol of Faith
esakal
-विजय नाईक, दिल्ली
इराण विरूद्ध अमेरिका व इस्त्रायल युद्धाची जबरदस्त झळ आखाती देशांना बसल्यामुळे यंदा पर्यटकांचा ओढा युरोपकडे वळलाय. त्यात स्पेनने उच्चांक गाठलाय. २०२५ मध्ये तब्बल ९ कोटी ७० लाख पर्यटकांनी स्पेनला भेट दिली. २०२६ मध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. उलट दुबईला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ६६ टक्के घट झाली आहे. वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे स्पेनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात १३ टक्क्यांची वृद्धी झालीय.
आखाती युद्धापूर्वी पर्यटक इजिप्त व तुर्की ला जाणे पसंत करीत होते. पण, हे देश युद्धाच्या तडाख्यात जातील की काय, या शंकेने पर्यटक युरोप व दक्षिण आशियातील जपान, थायलँड आदी देशांकडेही वळले आहेत.