'मी काळाच्या उदरात, विलीन झाल्यावर माझी सर्वजण आठवण काढतील'

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

रितो आदरे, सद्गुरु स्तवन ज्यांनी सत्य ज्ञान वाढविलं. धन्य पायथागोरस धन्य तो न्यूटन, धन्य आईनस्टाइन ब्रह्मवेत्त धन्य पाश्चर.., धन्य मादाम क्युरी, धन्य फ्राइड आणि धन्य तो डार्विन.. ज्यांनी आत्मज्ञान दिले आम्हा फॅरेडे, मार्कोनी वेट राईट धन्य धन्य सारे अन्य स्वयंसिद्ध! या कवितेतून विंदा करंदीकर यांनी वैज्ञानिक क्रांतीचे जनक आणि मानवी जीवन यांच्यातील नातेसंबंध सुरेख गुंफला आहे.

सूर्य पृथ्वीवर प्रथम अवतरतो तो सोनपावलांनी. त्याचे पहिले किरण पृथ्वीवर पसरतात, तेव्हा सर्वत्र एक दिव्य आभा पसरते. सकाळ उजाडते. तेव्हाच्या आकाशातल्या त्या गुलाबी छटा, ती सोनेरी किरणे, तो सौम्य तेजात न्ह्यायलेला कोवळा सूर्य... हे वर्णन सूर्य उगवतो त्या वेळचे आहे की, प्रतिभावंत वैज्ञानिकांनी विज्ञानात केलेल्या पहिल्या पदार्पणाचे आहे? विज्ञानात क्रांती घडवणाऱ्या वैज्ञानिकांची पहिली पावले सूर्याच्या पहिल्या किरणासारखीच नसतात का? येणाऱ्या तेजस्वी प्रकाशाची ती बोलकी पूर्व चिन्हेच असतात. कणाद, आर्यभट्ट, सी. व्ही. रमन, गॅलिलिओ, न्यूटन, एडिसन, आईनस्टाइन, डॉ. अब्दुल कलाम, स्टीफन हॉकिंग, जयंत नारळीकर अशा अनेक महान शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक क्रांती घडवून आणली. त्यांच्या या वैज्ञानिक क्रांतीमुळे आणि पूर्वीपासून होत चाललेल्या उत्क्रांतीमुळे मानवी जीवनाची पहाट उदयाला आली.

वैज्ञानिक क्रांतीमुळे मानवी जीवन एखाद्या सुंदर फुलाप्रमाणे फुलत गेले. माझ्या वाचनात आलेल्या काही ओळी मी तुमच्यासमोर नमूद करु इच्छिते. माणसाचे हात असे आहेत की, ते सहजपणे आघाडीचे वाफेचे इंजिन उचलतात. त्याचे पाय असे आहेत की, तो एका दिवसात हजारो किलोमीटर धावू शकतो. त्याचे पंख असे आहेत की, सर्व पक्षांपेक्षा अधिक उंचावर तो उडू शकतो. त्याचे कल्ले असे आहेत की, सर्व माश्यांपेक्षा अधिक चांगल्या रितीने तो पाण्याखालून पोहू शकतो. त्याचे डोळे असे आहेत की, जे अदृश्य गोष्टी पाहू शकतात आणि असे कान आहेत जगाच्या दुसऱ्या टोकाचे बोलणे ऐकू शकतात. तो एवढा ताकदवान आहे की, तो डोंगरांना बोगदे पाडू शकतो आणि धबधब्यांना हवेतच अडवू शकतो. स्वतःच्या इच्छेनुसार तो जगाची फेररचना करतोय, जंगलांची लागवड करतोय, समुद्राला जोडतोय, वाळवंटामध्ये पाणी आणतोय. हे कशाच्या जोरावर फक्त आणि फक्त विज्ञानाच्या जोरावर, वैज्ञानिक क्रांतीच्या जोरावर...

Can you imagine without science and scientific evolution? No off course no. कारण आपल्याला माहित आहे की, वैज्ञानिक क्रांतीमुळे आपण स्वतःला ओळखू शकलो. मायक्रो मोलेक्युल्सचा ध्यास घेत घेत विश्वाचा ध्यास घ्यायला लागलो. आता एक कॉमन example घ्या, आपण कोण फेसबुक, गुगल, स्मार्टफोन, आयपॅड, आयपॉड, लॅपटॉप व मोबाइल यासारखी गॅजेट्स युजर नाही आहेत? यावरूनच कळते की वैज्ञानिक क्रांतीचा मानवी जीवनात किती शिरकाव होत चाललेला आहे, मानवी जीवन किती बदलत आहे. वैज्ञानिक क्रांतीचा मानवी जीवनात खूप महत्त्वाचा वाटा आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपण रोज वापरतो. केमिस्ट्रीमधील वैज्ञानिक क्रांती खरोखरच अद्भुत आहे. डिटर्जंट, पेंट्स, फायबर्स, मेडिसिन्स, ग्लास, पेस्टिसाइड्स, पेपर्स, फर्टिलायझर्स या गोष्टी आपल्याला वैज्ञानिक क्रांतीमुळेच तर मिळतात. डार्विनचा सिद्धांत प्रमाणे, "Only Fittest Is Survival" हा वैज्ञानिक क्रांतीसाठी एक महान सिद्धांत आहे. वैज्ञानिक क्रांती होत गेली आणि आपण अधिक सक्षम प्रबळ आणि टेक्नोसॅव्ही होत गेलो. कोणे एकेकाळी आपण निसर्गाचे नम्र सेवक होतो, तर आता एक महाबलाढ्य मालक बनलो. आता आपण क्लोनिंग करू शकतो, ट्रान्सजे निक प्लांट तयार करू शकतो, प्लांटेशन करू शकतो, डीएनएमध्ये बदल करून डिझायरेबल ऑरगॅनिझम तयार करू शकतो, डीएनए, हायब्रीड डायजेशन करून नवीन प्रजाती उदयास आणू  शकतो. Splice आणि Jurassic park सारख्या चित्रपटात ते उत्कृष्ट रित्या मांडले आहे.

वेगवेगळ्या रोगांवर वेगवेगळी मेडिसिन वैज्ञानिक क्रांतीमुळे तर तयार झाली. अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टने तयार केल्या पेनिसिलीनची गोष्ट तुम्हाला ठावूकच आहे, पण तुम्हाला ठाऊक आहे का? ब्लड फॉर्मेशनसाठी देखील सध्या सायंटिस्ट प्रयत्न करत आहेत. रोबोट जगात वावरायला कोणाला आवडणार नाही. वेगवेगळ्या मॉडेलच्या रोबोट तयार केले जातात ते फक्त वैज्ञानिक क्रांती मुळेच ना? आता तर teaching करणारा आणि वाळूतून सहजपणे होऊ शकणारे रोबोट तयार झाला आहे व त्यांची आता मानवी जीवनात गरज आहे. आपण टर्मिनेटर, हॅरी पॉटर, स्पायडरमॅन, सुपरनोवा यासारखे पिक्चर मोठ्या आवडीने बघतो. हे पिक्चर म्हणजे वैज्ञानिक क्रांती आणि मानवी जीवन यामधील आविष्कारच म्हणायला पाहिजे. फ्रीज, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट यांनी तर मानवी जीवन व्यापून टाकले आहे. "To Every Action There Is Always Equal And Opposite Reaction" हा न्यूटन चा law आपण प्रत्यक्ष जीवनात अवलंबतो. त्या विज्ञान क्रांतीमुळे मानवी जीवनात देखील क्रांती घडते आणि मग पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळते आणि अनेक आपत्ती येऊन देखील जपानसारखा देश उगवता सूर्यासारखा तळपतच  राहतो.

मला रात्री काळ्याभोर नभांगणातील ग्रह, तारे, नक्षत्रे, धूमकेतू व अनेक ऑब्जेक्ट जसे की, ब्लॅक होल, व्हाईट हॉल यांचा अभ्यास करायला खूप मजा येते. हळूहळू समजा लागली की, 'बिग बँग 'थेअरीमुळे आपली पृथ्वी उदयास आली. खगोलशास्त्रातील वैज्ञानिक क्रांतीमुळेच तर या अंतरिक्षाच्या पसाऱ्यात आपली पृथ्वी एका अणू  पेक्षा लहान आहे याची आपल्याला कल्पना आली. यात गॅलिलिओ, कोपर्निकस, आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञांचे मोलाचे कार्य आहे. वैज्ञानिक क्रांतीमुळे मानवी जीवन एका सुरेख धाग्यांनी विणलेल्या सारखे वाटते. वैज्ञानिक क्रांतीमुळे हे अथांग विराट अंत्रिक्ष मानवाच्या कवेत येत चाललेले  आहे, तरी देखील ते विस्तारत चाललेले चाललेले आहे. पूर्वी आपण एखाद्या ऑब्जेक्ट कडे फक्त size आणि slope आणि density या दृष्टिकोनातूननच पाहत होतो, पण आइन्स्टाइनने चौथे युनिट शोधून काढले आणि त्यावरच मानवी जीवन आणि अंतरिक्षातील घटना विसंबून आहेत आणि ते युनिट म्हणजे "टाईम". वेळेला मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे आपणा सर्वांना माहितच आहे.

वैज्ञानिक क्रांती एखाद्या universal splicer प्रमाणे मानवी जीवनात आली आणि स्ट्राँग पॉइंट बनून गेली, पण तोच स्ट्रॉंग पॉइंट विक पॉइंट पण बनू नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आपण वैज्ञानिक क्रांतीमुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करायला हवा. आईन्स्टाईनने E=mc2 हे सूत्र शोधून काढले आणि कशासाठी आपण त्याचा वापर करतो ॲटम बॉम्ब तयार करण्यासाठी वेगवेगळ्या गॅसचा वापर करून आपली पिढी भरकटत चालली नाही ना?  याचा पण विचार करायला हवा. आपल्या पृथ्वी शिवाय या अथांग अंतरिक्षात कुणी शेजारी आहे का? वेगळी संस्कृती उदयास येत आहे का? या विषयात देखील वैज्ञानिक क्रांती होत चाललेली आहे. आपण त्या अंतरिक्षातील शेजार्‍याची प्रेषिता सारखी वाट पाहत आहोत. कुणास ठाऊक कदाचित ते देखील वाट पाहत असतील.. वैज्ञानिक क्रांती आणि मानवी जीवन यांच्यातील संबंध हे यापुढे देखील असेच राहणार आहेत याविषयी न्यूटनचे शब्द मला आठवतात तो म्हणतो. "मी काळाच्या उदरात विलीन झाल्यावर माझी सर्वजण आठवण काढतील, पण मी मात्र पुन्हा लहान मूल होऊन समुद्रकिनारी शंख शिंपले गोळा करत असेन आणि तरीदेखील अनाकलनीय समुद्र माझ्याकडे आवासून उभाच असेल एखाद्या अज्ञातासारखा...!

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com