Navratri : शारदीय नवरात्र महोत्सव - शक्तीचा उत्सव

Shailputri, Navratri Festival, Goddess Durga यांच्या महत्त्वाविषयी जाणून घ्या. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिमालयाची कन्या शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. देवीचे स्वरूप, पौराणिक कथा, पूजाविधी, मंत्र आणि नैवेद्य यांची माहिती या लेखातून मिळेल.
Goddess Shailputri, the First Form of Navdurga Worshipped on the First Day of Shardiya Navratri

Goddess Shailputri, the First Form of Navdurga Worshipped on the First Day of Shardiya Navratri

esakal

Updated on: 

डॉ. अपर्णा कल्याणकर

आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होत आहे.वाचकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! या निमित्ताने येत्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या 'नवदुर्गा' रूपांचा परिचय आपण करून घेणार आहोत. धनसंपत्ती,ऐश्वर्य प्राप्त करून देणारी लक्ष्मी, ज्ञान- बुद्धीचे वैभव देणारी सरस्वती, विश्वाचे भरण-पोषण करणारी विश्वंभरा, मंगलत्वाचे साम्राज्य निर्माण करणारी मंगळागौर, अन्नधान्याची समृद्धी देणारी श्रीगणेशाबरोबरची गौरी, संकटांपासून रक्षण करणारी दुर्गा, संहारशक्ती आणि पराक्रमाची देवता काली, अन्नाने तृप्त करणारी अन्नपूर्णा, सूर्याप्रमाणे तेजःपुंज बनवणारी गायत्री, बहुविध औषधी गुणांनी युक्त तुलसी, निसर्गाशी सान्निध्य साधलेली चैत्रगौर, भूप्रदेश सुपीक करणाऱ्या पवित्र सरिता, गोमाता सुरभी, भाग्यदात्री षष्ठीदेवता, दीर्घायुष्य व आरोग्य देणारी जीवंतिका, क्षमाशील धरित्री, ज्ञानामृत पाजणारी भगवद्गीता, आणि स्वातंत्र्यलक्ष्मी भारतमाता, देवींच्या ह्या विविध रूपांचे पूजन वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याकडे सतत सुरू असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com