आत्महत्या हाच शेवटचा पर्याय असतो का?

special story on Suicide and mental illness
special story on Suicide and mental illness

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्र्यातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. सुशांत खूप शार्प आणि हुशार, समर्पणवृत्तीने काम करणारा कलाकार होता. मग सुशांतने हे टोकाचं पाऊन का उचललं? असा त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच विचारात टाकणारा प्रश्न आहे. त्याने आत्महत्या का केली, याचं कारणही अजून स्पष्ट झालं नाही. सुशांतच्या आधीही अनेकांनी आत्महत्या करून आपलं जीनण संपविलं आहे. जगात सगळ्यात मोठी लोकशाही नांदणार्‍या आपल्या देशात आत्‍महत्यासारखा प्रश्न गंभीर बनला आहे.  

याबाबत आकार फौंडेशनचे अध्यक्ष आणि वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आत्महत्येच्या कारणांसह देश ते जागतिक पातळीवर आत्‍महत्यांचं प्रमाण काय आहे?, याबाबत माहिती दिली. 

डॉ. प्रदीप पाटील सांगतात, ‘‘आपल्‍या वागण्याच्या पध्दती, रोजच्या समस्‍यांना तोंड देण्याच्या आपल्‍या कल्‍पना, आत्‍हत्‍येशी निगडीत आहेत. शिवाय अलिकडे लोकांची सहन करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. कठिण परिस्थिती निर्माण होते. त्‍यावेळी त्या परिस्थितीशी तोंड देता येत नाही. आपण आता कंगाल होणार, समाजात आपली पतिष्‍ठा जाणार, असे विचार डोक्यात येतात, त्याच वेळी या लोकांना एक झटका येतो आणि ते लोक आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न करतात.’’ 

कवी मंगेश पाडगावकर यांनी जीवनाविषयी फार सुंदर लिहून ठेवलं आहे. या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावं, असं जेव्‍हा ते लिहितात तेव्‍हा जगण्यातील मजा आणखी आपल्याला कळते. जीवन सुंदर आहे, आणि ते सुंदरपणे जगलं पाहिजे असं जेव्‍हा वाटतं तेव्‍हा नैराश्य खूप लांब पळून जातं. बदलत्या जीवनशैलीमुळे नैराश्य आपली पाठ सोडत नाही, असं उगाच माणसांना वाटतं आणि माणसं नैराश्याच्या गर्तेत सापडतात. यातुनच आयुष्याकडे बघण्याची नकारात्‍मक भावना तयार होते. सध्याच्या पिढीला संघर्ष म्‍हणजे भितीचं ओझं वाटतं म्‍हणुनच नैराश्यचं भूत मनावर बसलं की आत्‍महत्येचा विचार येतो आणि कोणताही विचार न करता आयुष्य संपवलं जातं. सध्याच्या काळातील आत्‍मत्येचं प्रमाण बघून वाटतं, आत्महत्या हाच शेवटचा पर्याय असतो का? 

मानसिक आजार हे एक आत्मह्त्येमागील महत्वाचं कारण असल्याचे डाॅ. पाटील सांगतात. ते सांगतात की, ‘‘ज्‍यांना मानसिक आजार आहे, त्‍यातील ५० टक्‍के लोक आत्‍महत्‍या करतात आणि आत्‍महत्‍या केलेल्‍यांमधील ५० टक्‍के लोकांना हा आजार असतो. जगभरात ४० सेकंदाला एक आत्‍महत्‍या होते. त्‍यातील ३९ टक्‍के आत्‍महत्‍या या आशियाई देशात होतात. आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न करणाऱ्या  २५ लोकांमधील २४ जण वाचतात आणि एक जण आत्‍महत्‍या करतो. जर कोण आत्‍महत्‍या करणार म्‍हणत असेल तर त्‍याकडे दुर्लक्ष न करता आपण त्‍याला विचारले पाहिजे की, खरंच त्‍याला तसं वाटतं का? आपल्‍या आसपास असं कोण  म्‍हणाले तर त्‍यासाठी तीन पर्याय आहेत. World Mental Health Foundation आणि World Suicide Prevention Organization यांनी या वर्षी ‘एक मिनिट तुम्‍ही थांबा’ ही थीम तयार केली आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक दुखणे, आजारांना सामोरे जावे लागते. वेळीच उपचार घेऊन आपण त्यावर मात करतो, पण मानसिक आजारांबाबत तसे होताना दिसत नाही. मानसिक आजार वेळीच लक्षात न आल्याने किंवा त्यांकडे दुर्लक्ष केल्याने व्यक्ती मानसिक आजाराची बळी ठरते. 

रोजच्या जीवनात ताणतणावाला सामोरे जात असताना निद्रानाश, उदासीनता, नैराश्य, आत्महत्येचे विचार येणे अशा विविध स्वरूपामध्ये समाजात मानसिक आजार दिसून येतात. व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित असेल तरच ती व्यक्ती कामाच्या ठिकाणी, घरात, आप्तेष्टांमध्ये वावरताना आत्मविश्वासाने वावरु शकते, पण आत्मविश्वासाच्या अभावी व्यक्तीच्या मनःस्थितीवर परिणाम होऊन त्याच्या वर्तनावर तसेच एकूणच कामावर आणि नातेसंबंधावर परिणाम दिसून येतो. मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये तसेच त्याच्या नातेवाईकांमध्ये मानसिक आजाराबाबत असलेल्या न्यूनगंडामुळे हा आजार लपवून ठेवण्याकडे या लोकांचा कल असतो. परिणामी या आजाराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे समाजामध्ये विध्वंसक प्रवृत्ती व आत्महत्येच्या प्रकारांमध्ये वाढ होत आहे. रोजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या जीवनामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो.

‘एक मिनिट तुम्‍ही थांबा’ या थीमनुसार, ज्‍यावेळी आपल्‍या आसपास आत्‍महत्‍येचा विचार कोणी बोलून दाखविला तर, एक मिनिट वेळ काढून त्‍याच्याशी बोला. त्‍यानंतर या विषयावर त्‍याच्याशी एक मिनिट संवाद साधा. संवाद साधून झाल्‍यानंतर त्‍याला डॉक्‍टर किंवा काऊन्‍सिलरकडे घेवून जा. यामुळे आत्‍महत्‍येचा विचार मनात आणलेला व्यक्‍ती आत्‍महत्‍या करणार नाही.’’असे डॉ. पाटील सांगतात.  

आज समाजामध्ये डिप्रेशन म्‍हणजे काय हेच माहित नाही. लोकांनी जर डिप्रेशन म्‍हणजे काय याची कारणे जाणून घेतली आणि शासनाने ती माहित करून देण्यासाठी उपाय योजना राबविल्‍या तर, आत्‍महत्‍या रोखता येऊ शकतात. असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्‍त केला. 

माणसाला आयुष्यात जगण्याचं काैशल्य येणं खूप महत्वाचं आहे. जीवणात कोणताही प्रसंग आला तर त्याला तोंड देता आलं पाहिजे. शासनाहे हे काैशल्य शाळांधूनच मुलांना देणं गरजेचं असल्याचेही डाॅ. पाटील सांगतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com