
प्रसाद महेकर
२६ जून राजर्षी शाहू महाराज जयंती.शाहू महाराजांच आयुष्य केवळ ४७ वर्षांच पण या आयुष्यात त्यांनी येणारी अनेक शतके लक्षात राहतील अशी कार्ये केली. त्यामध्ये प्रथम आरक्षणाची सुरुवात, शिक्षणाचा प्रसार त्याकाळी एखादा राजा आपलं नाव कायम राहावं यासाठी मंदिरे बांधत होते तेव्हा राजर्षी शाहू महाराज यांनी प्रत्येक जाती-धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह उभारली आजही हि वसतिगृह विद्यार्थ्यांना वरदान ठरत आहेत. एकूणच शाहू महाराज यांनी कोल्हापुरात कला, क्रीडा, शिक्षणाची बीज पेरली. आज जे कोल्हापूर सर्वगुणसंप्पन आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे राजर्षी शाहू महाराज.