
१मुख्य स्रोतापासून वेगळा झालेला पहिला प्रवाह पुण्यात मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन १८७८ साली पार पडले. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुहूर्तमेढ उभारणाऱ्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याकडे या संमेलनाचा शुभारंभ करण्याचा मान जातो. त्यानंतर दुसऱ्या ग्रंथकारांचे संमेलनासाठी जोतिबा फुले यांना न्यायमूर्ती रानडे आमंत्रण दिले तेव्हा जोतिबांनी विद्रोहाची भूमिका घेऊन या संमेलनास येणार नाही असे लेखी कळवले.