बारमाही नियंत्रित पाणीपुरवठा हवा

शिवराम गोपाळ वैद्य
मंगळवार, 7 मे 2019

पुणे : महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, पुण्यामध्ये दर वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई जाणवू लागते आणि मग पाणी कपातीच्या गोष्टीवर चर्चा सुरू होते. पुण्यामधील पाणीकपात हा खरोखर एक संशोधनाचा विषय आहे. खरे तर पुणेच काय तर महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वर्षातील ३६५ दिवस नियंत्रित पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. बाराही महिने 'चोवीस तास पाणी' ही चैन इथून पूढे कोणत्याही भागाला परवडणारी नाही.

'आमच्या पिढीने जेवढे साजूक तूप खाल्ले आहे तेवढे तुमच्या पूढील पिढ्यांना पिण्याचे स्वच्छ आणि निर्मळ पाणीही मिळणार नाही” असे जुनेजाणते लोक सांगत असत. तेव्हा, पाण्याचे नियोजन करतांना पूढील वर्षी कमी पाऊस झाला, उशीरा पाऊस आला किंवा पावसाने दडीच मारली, तर अशा परिस्थितीतही गरजेपुरता पाणीपुरवठा करता आला पाहिजे. अशा पद्धतीने विचार करणे, अशा प्रकारे पाण्याचे नियोजन आपण आत्तापासूनच करणे गरजेचे आहे. बेजबाबदारपणे वागल्यास 'असेल तेव्हा दिवाळी' केली तर, आपल्यावर 'नसेल तेव्हा शिमगा' करण्याचीही वेळ येणार आहे हे नक्की !

पाण्याची गळती, बेकायदा उपसा, पाण्याची चोरी अशा मुद्यांवरही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरूनही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच या धरणातील पाणीसाठा शुन्य टक्के झाला होता. यावर बाकी काहीही बोलण्याची गरज आहे असे वाटत नाही. 

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

Web Title: बारमाही नियंत्रित पाणीपुरवठा हवा