विश्रामबागवाड्याच्या संवर्धनाची नितांत गरज

अजित नाडगीर 
Wednesday, 28 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुण्यातील विश्रामबागवाड्याच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. येथे परदेशी पर्यटक भेट देतात पण त्यांना या ठिकाणाची ऐतिहासिक माहिती देण्यासाठी कोणीही नाही. जर वास्तुचा ऐतिहासिक प्रवास दृक-श्राव्य माध्यमातुन सादर केला तर पर्यटकांना अनुभव वेगळा घेता येईल. महापालिकेने याचा विचार करावा.

तसेच येथे स्वच्छतागृह सोय नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होतेच शिवाय येथील कर्मचार्यांनाही बाहेर जावं लागतं. महानगरपालिकेने शुल्क आकारुन जरी ही सुविधा अमलात आणली तर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. तरी महानगरपालिकेने विश्रामबागवाड्याच्या मुलभुत सोयी व संवर्धनासाठी पाऊले उचलावीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Absolute need for conservation of vishrambag wada