आंबेगाव विकासापासून कोसो दूर 

- ज्ञानेश्‍वर सोळसकर
रविवार, 14 जुलै 2019

नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह आंबेगाव खुर्दही महापालिकेत येऊन दीड वर्ष झाले, परंतु तातडीच्या पायाभूत सुविधा देण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. 
 

नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांसह आंबेगाव खुर्दही महापालिकेत येऊन दीड वर्ष झाले, परंतु तातडीच्या पायाभूत सुविधा देण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. शनिनगर परिसरातील ओढा पुलावर साठणारे पावसाचे पाणी महिला, ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

सलग पाऊस पडल्यावर ओढा पूल परिसरात पाण्याचे तळे साचलेले असते. पुलावर साठणार्या पाण्याचा निचरा व्हावा अशी व्यवस्था तरी प्रशासनाने करावी. आठ महिने बोरवेलच्या पाण्यावर गुजराण करणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यासाठी पावसाची वाट पाहणाऱ्यांना पावसाळ्यात ओढा ओलांडायची कसरत करावी लागते. नुकत्याच निवडणुका होऊन या अकरा गावांसाठी दोन प्रतिनिधी दिले आहेत. या भागातल्या शेकडो समस्या सोडवणे हे नव्या प्रतिनिधींसाठी आव्हान आहे. पाणी, सांडपाणी व मैलापाणी वाहिन्यांची कामे, शनिनगर ते जांभूळवाडी मार्गावर ठराविक ठिकाणी गतिरोधक उभारणे आवश्‍यक आहे. मार्गाच्या दुतर्फा उभी असलेली वाहने आणि त्यामुळे अरुंद होणारा रस्ता वाहतूक कोंडीत अडकला आहे.

अनेक सोसायट्यांची महापालिकेत नोंद झालेली नाही. त्यांची नोंदणी वेगाने व्हावी ज्यामुळे महापालिकेला संकलित होणारा महसूल या भागाच्या विकास कामांवर खर्च करता येईल. अन्यथा, वीस वर्षांसून गावं सोडून शहरात आलेल्या सर्वसामान्यांना "गड्या आपला गाव बरा' असे म्हणण्याची वेळ येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambegaon Away from the development