कुणी वाहतूक पोलिस देतं का? 

प्रशांत  बोगम
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

ससानेनगर : स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कामांचा ट्रॅफिकचा त्रास ससानेनगर भागातील नागरिकांना 20 वर्षांपासून सहन करावा लागतो. दररोज सायंकाळ या परिसराच वाहतुकीचा खोळंबा होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली अतिक्रमण, रेल्वे यामुळे रोज दीड दोन तासवाहतुकी कोंडी होते. लाखो रुपये खर्चून बसवलेला सिग्नल असून नसल्यासारखा आहे. ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर गाड्यांचा आवाज व धूरामुळे कानावर आणि नाकावर हात ठेवावा लागतो.  

पोलिस जबाबदारी घेत नाही. केव्हातरी तिथे हजर असतात. लहान मुले, जेष्ठ नागरिक यांना रस्ता पार करण्यासाठी खूपच कसरत करावी लागते. या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारीमार्ग या वादात न पडता प्रशासनाने वाहतूक सुरळीसाठी कोणत्याही मार्गाची उपाययोजना करावी. श्रेयवाद न करता एकत्र येऊन ट्रॅफिकचा प्रश्न सोडवावा. अजून किती दिवस सहन करायचे ? स्थानिक वाहतूक पोलिसांनी याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे. अन्यथा नागरिकांनाच रस्त्यावर उतरून म्हणावे लागेल ' कुणी वाहतूक पोलिस देतं का? वाहतूक पोलिस...वाहतूकीची कोंडी सोडवायची आहे ' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appoint traffic police in sasane nagar area