कर्वे रस्ता : कर्वे रस्त्यावर सदानंद हॉटेलशेजारील शर्मद रेसिडन्सी सोसायटीकडे जाणारा कॉंक्रिटचा रस्ता पाइपलाइन टाकण्यासाठी खोदला आहे. कॉंक्रिटचा रस्ता तयार करताना सर्व पाइपलाइन रस्त्याच्या बाजूला घेऊन रस्ता तयार करण्याचा नियम आहे. ज्यामुळे एकदा केलेला कॉंक्रिटचा रस्ता परत खोदला जाणार नाही. असा नियम असतानाही हा रस्ता खोदला आहे. त्यामुळे एवढा मोठा खर्च वाया गेला आहे. महापालिकेकडे निधीची कमतरता असताना असा दुरुपयोग योग्य नाही. महापालिकेने याची चौकशी करून याला कोण जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. यापुढे अशा प्रकारची कामे करू नयेत.